घरबसल्या अनुष्का विराटला म्हणतेय, 'ए कोहली चौका मार ना..' विराटने दिली अशी रिऍक्शन..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहली सोशल मिडीयावर चांगलेच ऍक्टीव्ह आहेत..कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करत दोघेही त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत.. नुकताच अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय..यात दोघांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय..

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे..घरबसल्या सगळेच कंटाळले आहेत..नेहमीच शूटींगमध्ये व्यस्त असणारे सेलिब्रिटी मात्र त्यांच्या परिवारासोबत क्वारंटाईन टाईम एन्जॉय करताना दिसत आहेत..लॉकडाऊन दरम्यान अनेक सेलिब्रिटी चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी घरबसल्या करत असलेल्या गोष्टी सोशल मिडीयावर शेअर करत आहेत..अशातंच अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत घरात वेळ घालवत आहे..दोघेही सोशल मिडीयावर चांगलेच ऍक्टीव्ह आहेत..कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करत दोघेही त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत.. नुकताच अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय..यात दोघांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय..

हे ही वाचा: अभिनेत्री गिरीजा ओकचा 'क्वार्टर' लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

अनुष्काने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'मला असं वाटतं या दिवसात विराट कोहली क्रिकेटला खूप मिस करत असेल, कारण मैदानावर त्याला त्याच्या लाखो चाहत्यांचं प्रेम मिळत असतं..आणि तो नक्कीच त्याच्या त्या खास चाहत्यांना मिस करत असेल, म्हणून मी विचार केला की त्याला हा अनुभव इथे करुन द्यावा..' आणि यासाठी अनुष्का त्याला जसे त्याचे चाहते त्याचा उत्साह वाढवण्यासाठी घोषणा देतात तसं व्हिडिओमध्ये जोरजोरात 'ए कोहली.. चौका मार ना चौका' असं म्हणताना दिसतेय...यावर विराटने दिलेली रिऍक्शन ही फारंच मजेशीर आहे..

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे..हा पोस्ट झाल्यावर काही तासांतच याला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत..अनुष्का आणि विराटचा हा मजेशीर अंदाज चाहत्यांसोबतंच सेलिब्रिटींनाही आवडतोय..अनेक सेलिब्रिटींच्या मजेशीर कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत..

anushka sharma hilariously asks virat kohli to hit a four watch viral video on social media


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma hilariously asks virat kohli to hit a four watch viral video on social media