virat anushka vamika
virat anushka vamika

वामिकाचं Two Month सेलिब्रेशन; मम्मा अनुष्काने शेअर केला खास फोटो

Published on

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 11 जानेवारीला कन्यारत्न झाले. विरुष्काने त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. घरी मुलीचं आगमन झाल्यानंतर सोशल मीडियावर अनुष्का आणि विराट यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव झाला. महिला दिनानिम्मित्त विराटने अनुष्का आणि वामिकाचा फोटो शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

फोटो शेअर करून विराटने असे कॅप्शन दिले की, 'माणसाच्या आयुष्यात जन्म दिलेल्या बाळाला पाहणे हा अविश्वसनिय, आश्चर्यजनक आणि सुंदर अनुभव आहे. या अनुभवाचा साक्षी झाल्यावर महिलांचे खरे सामर्थ्य, देवत्व समजले आणि देवाने त्यांच्यामध्ये जीव का निर्माण केला तेसुद्धा समजले. माझ्या आयुष्यातील कणखर आणि माझा जीव असलेल्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि जगातील सर्व महिलांना देखील शुभेच्छा'. या फोटोमध्ये वामिकाने अनुष्काच्या गालावर हाथ ठेवलेला दिसत आहे. 

आता अनुष्काने पुन्हा एक नवा फोटो शेअर केला आहे. याचं निमित्त होतं लाडक्या वामिकाच्या जन्माला दोन महिने पूर्ण झाले. वामिकाला दोन महिने झाल्याच्या या खास दिवसाचं घरी जंगी सेलिब्रेशन केलं आहे. अनुष्काने सोशल मीडियावर वामिकाच्या बर्थ डेच्या केकचा फोटो शेअर केला. हा फोटो वामिकाच्या वाढदिवसाच्या केकचा आहे. हा रेम्बॉकेकचा फोटो शेअर करून अनुष्काने, 'हॅप्पी 2 मन्थ टू ऑफ अस' असे लिहीले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

काही दिवसांपूर्वी अनुष्काने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामध्ये तिच्या खांद्यावर बाळाचे कपडे आहेत. या फोटोला अनुष्काने 'माझी सध्याची सर्वात आवडती एक्सरसाइज' असं कॅप्शन दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com