विराट-अनुष्काचं चाहत्यांना न्यू ईयर गिफ्ट;मुलीचा व्हिडीओ केला शेअर Anushka Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma,Virat Kohli,vamika

विराट-अनुष्काचं चाहत्यांना न्यू ईयर गिफ्ट;मुलीचा व्हिडीओ केला शेअर

अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि विराट कोहली(Virat Kohli) सध्या आपल्या मुलीसोबत साऊथ आफ्रिकेत आहेत. विराट क्रिकेट टूरवर आहे तर नेहमीप्रमाणे अनुष्का त्याला सपोर्ट करण्यासाठी मुलीला घेऊन त्याच्यासोबत गेलीय. आता अनुष्का आणि विराटनं त्यांची मुलगी वमिकाला नेहमीच कॅमे-यापासून लांब ठेवलंय. आजपर्यंत त्यांच्या मुलीला प्रत्येकानं पाहिलंय ते पाठमोरं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात तिच्या दिसण्याविषयी खूप उत्सुकता असणार हे स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी जानेवारीतच विराट-अनुष्काला कन्यारत्न प्राप्त झालं. म्हणजे आता जानेवारीत तिचा पहिला वाढदिवसही आहे. ज्या सेलिब्रेशनच्या तयारीत संपूर्ण कुटुंब निश्चितच असणार. पण या सेलिब्रेशनच्या आधीच अनुष्कानं वमिकाचा व्हिडीओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

हेही वाचा: कंगनाचा नवा ड्रामा;राहू-केतूना घातलं साकडं;म्हणाली,''नवीन वर्षात...''

अनुष्कानं व्हिडीओ शूट केला आहे ती संध्याकाळ आहे 31 डिसेंबर,2021ची. साऊथ आफ्रिकेतील एका हिरव्यागार गार्डनमधील. त्या सुंदर गार्डनची झलक पाहून आपण भारावतोय इतक्यातच आपल्याला एक आवाज ऐकू येतो,तो असतो वमिकाचा अर्थात विराट-अनुष्काच्या मुलीचा. अगदी तान्ह्या बाळाच्या तोंडून आईसाठी पहिले शब्द जेव्हा उच्चारले जातात तसाच तो आवाज. एका आईसाठी परमोच्च आनंदाचा क्षण आणि चाहत्यांसाठी मंत्रमुग्ध करणारा क्षण. अनुष्काच्या मुलीनं थेट साऊथ आफ्रिकेत जाऊन अनुष्काला ''मम्मा'' म्हणून हाक मारली आहे. आणि अनुष्कानं तो क्षण कमे-यात बंदिस्त करत चाहत्यांसोबत शेअर केलाय.

आता प्रश्न उरतो फक्त आवाजाचीच झलक का? तर हो,आता सध्या फक्त आवाजाचीच, पण कोण जाणे वमिकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिची पहिली झलक चाहत्यांना दाखवायची असं तिच्या या सेलिब्रिटी आई-वडिलांनी योजलं असेल बहुधा. त्या व्हिडीओला शेअर करीत अनुष्कानं कॅप्शन दिलंय की,''2021च्या शेवटच्या दिवसाची ही सर्वात सुंदर संध्याकाळ आणि माझ्यासाठी सगळ्यात खास क्षण. एका आईसाठी आणखी काय हवं?''

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top