
कंगनाची नवीन वर्षाची पोस्ट व्हायरल;राहू-केतूना साकडे घालत म्हणाली...
वाद आणि कंगना(Kangana ranaut) यांचं खूप जवळचं नातं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. एकतर ती स्वतः काहीबाही बरळून वादात उडी मारते किंवा दुस-्या कुणाच्या तरी गोष्टीत नाक खुपसून वादळी संकटाला स्वतःहून ओढवून घेते. मग अगदी तिचे ह्तिक रोशनसोबत बिघडलेले संबंध असोत की थेट जावेद अख्तरांशी तिनं घेतलेला पंगा असो की त्याहीपुढे जाऊन भारताला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक....असं टोकाचं काहीतरी बरळणं असो. आता तिच्या बेतालपणाचा किती तो पाढा वाचायचा बरं,तो वाचू तेवढा कमीच. पण आता कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. काय आहे ते कारण चला जाणून घेऊया.
तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या कंगना बाई नवीन वर्षाचं निमित्त साधत थेट गेल्या तिरुपती बालाजीला. हो पण बालाजी मंदिराकडे त्यांचे पाय वळले नाहीत तर तिने गाठलं थेट बालाजी मंदिराच्या जवळचं राहू-केतूचं मंदिर. आता ती ज्या मंदिरात गेली होती ते जगातलं राहू-केतूचं असं एकमेव मंदिर आहे. आता आपल्या कंगना मॅडमच्या मागे एवढ्या कोर्ट केसेस लागल्यात की खरंच राहू-केतूंना तिनं साकडं घालणं गरजेचच होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्या मंदिरात जाऊन तिनं महायज्ञ घातला आणि देवाला साकडं घालत म्हणाली....''
हेही वाचा: अप्सरेचा पतिराजांसोबतचा भन्नाट डान्स पाहिलात का?
कंगनानं तिच्या सोशल मीडियावर पुजेचे फोटो आणि पोस्ट इथे शेअर केली आहे.
ती म्हणाली,''नवीन वर्षात सगळं ठीक होऊ देत. माझ्या दुश्मनांवरही देवाची कृपा होऊ दे. आणि त्यांना शहाणपण मिळू दे. तसंच नवीन वर्षात माझ्या मागे पोलिसांचा ससेमिरा कमी लागू दे,कोर्ट केसेस कमी होऊ देत आणि खूप सारं प्रेम मिळू दे, जय राहू केतू जी की ''. कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर पूजा करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. आणि पोस्टमध्ये तिनं आपणं देवाकडे काय मागितलं हे सविस्तर लिहिलंही आहे. आम्ही ती पोस्ट इथे जोडत आहोत.
Web Title: Kangana Ranaut Performed Some Rituals In Rahu Ketu Templreson Behind That Isread Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..