esakal | लाडक्या लेकीसोबत अनुष्काचा खास फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma

रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी केला कमेंट्सचा वर्षाव

Photo: लाडक्या लेकीसोबत अनुष्काचा खास फोटो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा Anushka Sharma सोशल मिडिया चांगलीच सक्रिय असते. अनुष्का आणि विराट कोहलीने Virat Kohli त्यांच्या मुलीचा चेहरा अद्याप माध्यमांसमोर दाखवला नाही आणि सोशल मीडियावरही अपलोड केला नाही. अष्टमीनिमित्त अनुष्काने बुधवारी तिच्या चाहत्यांसाठी मुलगी वामिकासोबतचा Vamika एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तो फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी त्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्या फोटोद्वारे अनुष्काने सर्वांना दुर्गाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वामिकासोबतचा एक फोटो शेअर करत, तिने कॅप्शन दिले ,"मला दररोज अधिक शूर आणि अधिक धैर्यवान बनवणाऱ्या माझ्या लहान वामिका, तुला नेहमी देवीची शक्ती लाभो. तुला अष्टमीच्या शुभेच्छा." या फोटोमध्येही वामिकाचा चेहरा स्पष्टपणे पहायला मिळत नाही. मात्र तिच्यासोबत खेळणाऱ्या अनुष्काच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य पाहून नेटकऱ्यांनी दोघींचं कौतुक केलं. अभिनेता रणवीर सिंगने 'ओह-ले' असं कमेंट करत हृदयाचे इमोजी पोस्ट केले. प्रियांका चोप्रानेही कमेंटमध्ये इमोजी पोस्ट केले आहेत. रणवीर आणि प्रियांकासोबत अनुष्काने 'दिल धडकने दो' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ताहिरा कश्यप, अथिया शेट्टी, वाणी कपूर, सानिया मिर्झा यांनीसुद्धा अनुष्का-वामिकाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा: आर्यनला 'सुपर डुपर स्टार' बनवणाऱ्या NCBचे आभार; राम गोपाल वर्मांचा टोला

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वामिकाच्या पब्लिक अपिअरन्सबद्दल 'वोग इंडिया' मासिकाशी बोलताना अनुष्का म्हणाली होती, “आम्ही याबद्दल खूप विचार केला आहे. आम्हाला निश्चितपणे आमच्या मुलीला लोकांच्या नजरेत मोठं करायचं नाहीये. आम्हाला वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवायचे आहे."

loading image
go to top