
Anushka Sharma Video: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या जोरदार चर्चेत आहे. तिनं नुकतीच पूमा इंडिया संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती,ज्यात तिच्या अनुमती शिवाय तिचा फोटो शेअर केल्यामुळे तिने कंपनीला खूप फटकारलं होतं. अर्थात, लोक मात्र शॉक झाले जेव्हा त्यांनी पाहिलं की काही वेळानंतर ती याच कंपनीला रस्त्यावर प्रमोट करत होती. तेव्हा सगळ्यांना समजलं की अनुष्कानं आधी जो ड्रामा केला होता तो एक पब्लिसिटी स्टंट होता. आता अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि मुंबईतील बान्द्रा विभागात गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम करण्यावरनं तिला लोक खूप सुनावताना दिसत आहेत. (Anushka Sharma Viral Video,arriving in swanky car,causing unnecessary traffic jam)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अनुष्का शर्मा एका स्वॅंकी कारमधनं येताना दिसत आहे. तिच्या आसपास खूप गर्दी जमलेली दिसत आहे. आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं आहे. जसं सोशल मीडियावर अनुष्काचा हा व्हिडीओ समोर आला,तसं लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. बिनाकारण ट्रॅफिक जाम केल्यामुळे अभिनेत्रीला खूप खरी-खोटी लोक सुनावताना दिसत आहेत.
अनुष्का शर्माच्या या हरकतीला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. एकानं लिहिलं आहे की,'हॅलो ज्युनियर जया बच्चनजी..', तर दुसऱ्या एकानं कमेंट लिहिली आहे की,'पोलिस या लोकांना का काही बोलत नाहीत ट्रॅफिक जाम केल्यावर',. तर आणखी एकानं लिहिलंय,'हे काही कलाकार कसे आहेत..एकदम मूडी आणि मतलबी..आपला हेतू साध्य करायचा असतो तेव्हा कॅमेऱ्यासमोर काहीही करायला तयार असतात. मीडियाशी गोड गोड बोलून नको-नको त्या पोझ देतात'.
अनुष्काच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर अनुष्का शर्मा गेली काही वर्ष सिल्व्हर स्क्रीनपासून लांब आहे. सध्या ती 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या तयारीत आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ती अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी सिनेमाशी संबंधित BTS व्हिडीओज आणि फोटो शेअर करताना दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.