
कलाविश्वात सेलिब्रिटींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व स्टारकिड्सना आहे.
कलाविश्वात सेलिब्रिटींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व स्टारकिड्सना आहे. मग हा स्टारकिड लहान असो किंवा मोठा, त्याच्या प्रत्येक गोष्टीच सोशल मीडियावर चर्चा होत असते आणि त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशाच काही स्टारकिड्सच्या नावांचा अर्थ जाणून घेऊयात..
वामिका- अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी ११ जानेवारी रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. या दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं. वामिका हे देवी दुर्गेचंच एक नाव आहे. अर्धनारीश्वरमधील नारीच्या स्वरुपाला वामिका म्हटलं जातं.
अनायरा- कॉमेडिनय कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी छत्रथ यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव त्यांनी अनायरा असं ठेवलं. अनायरा हे देवी लक्ष्मीचं एक नाव असल्याचं म्हटलं जातं.
वेद- अभिनेता सुमीत व्यास आणि एकता कौल यांनी त्यांच्या मुलाचं नाव वेद असं ठेवलं. वेद हा 'विद' या शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ ज्ञान असा होतो.
साफो- अभिनेत्री कल्की कोचलीनच्या मुलीचं नाव साफो आहे. साफो हे अत्यंत अनोखं नाव आहे. एका ग्रीक कवीच्या नावावरून तिने हे नाव ठेवलंय.
समीशा- शिल्पा शेट्टी सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई झाली. तिच्या मुलीचं नाव समीशा असं ठेवण्यात आलं. स चा अर्थ संस्कृतमध्ये 'असणे' असा होतो आणि रशियन भाषेत मीशाचा अर्थ ईश्वर असा होतो.
अगस्त्या- क्रिकेटर हार्दिक पांडेच्या मुलाचं नाव अगस्त्या आहे. अगस्त्य हे महान विद्वान ऋषी होते.
हेही वाचा : 'लग्नानंतर कसं वाटतंय?'; मिताली मयेकरचं भन्नाट उत्तर