बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.
 

यापूर्वीही अनुष्का शर्माच्या सुई धागा या सिनेमातील चित्रपटातल्या एका सीनवरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. सुई धागा या चित्रपटात चेहऱ्यावर हात ठेऊन बसलेला फोटो नेटीझन्सकडून प्रचंड व्हायरल करण्यात आला होता.
 

दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला होता. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं होतं. यावर, विराट कोहलीलाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नव्हता. अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज एमोजी पोस्ट केल्या होत्या.

अनुष्कानं शेअर केला बिकनीतील फोटो; पाहा विराटची कमेंट

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharmas Orange Swimsuit Pic Gets Meme Machines Churning