अपारशक्ती खुरानाने दाखवली झलक, कोरोनानंतर असे शूट होतील रोमँटीक सीन...

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

नुकतंच अभिनेता अपारशक्ती खुराना याने त्याच्या हेलमेट सिनेमाचा एक सीन शेअर केला आहे. आणि त्याच्यासोबतंच जर हा सीन कोरोनामध्ये शूट केला गेला असता तर कसा असता हे देखील दाखवलं आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरस महारोगराईच्या संसर्गानंतर अनेक गोष्टींची उलथापालथ होणार आहे. समाजात खूप सारे बदल पाहायला मिळणार आहेत. या परिस्थिती एक शिंक आल्यास सुद्धा लोक संशयित नजरेने पाहतात. या व्हायरसवर ठोस असं औषध मिळू शकलेलं नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, शील्ड आणि सोशल डिस्टन्सिंगचा प्रचार केला जात आहे. नुकतंच अभिनेता अपारशक्ती खुराना याने त्याच्या हेलमेट सिनेमाचा एक सीन शेअर केला आहे. आणि त्याच्यासोबतंच जर हा सीन कोरोनामध्ये शूट केला गेला असता तर कसा असता हे देखील दाखवलं आहे. 

हे ही वाचा: 'हॅप्पी न्यु ईयर' सिनेमाच्या आठवणीत अभिषेक म्हणाला, 'केवळ आम्ही एका रुममध्ये एकत्र झोपलो नाही'

कोरोनामध्ये सगळ्यात जास्त चर्चा या गोष्टीची आहे की आता रोमँटीक सीनची शूटींग कशी होणार? अभिनेता अपारशक्ती खुरानाने याची देखील झलक दाखवली आहे. त्याने त्याच्या 'हेलमेट' या सिनेमाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तो स्वतः आणि प्रनुतन बहल आहे. एक फोटो हा सामान्य आहे तर दुस-या फोटोमध्ये दोघांनी फेसशिल्ड लावलेले पाहायला मिळत आहेत.

अपारशक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'बरं झालं हेलमेटचा हा सीन या महारोगराईच्या आधी शूट झाला. नाहीतर आजकाल आम्हाला अशा सीन्ससाठी प्रोटेक्शन घेण्याची गरज भासली असती. हेलो, प्रोटेक्शनचा अर्थ मास्क. तुम्ही लोक पण ना काय विचार करायला लागलात..सगळेट हेलमेट सारखे नसतात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Achha hua this scene for

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana) on

अभिनेता अपारशक्ती 'हेलमेट' या सिनेमातून पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल आहे. एका मुलाखती दरम्यान अपारशक्तीने सांगितलं होतं की, सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून निर्णय घेता येईल की तो यापुढे मुख्य भूमिका साकारणार की एखाद-दुस-या सिनेमात सहकलाकाराची भूमिका बजावणार ते.    

aparshakti khurana shares helmet scene and compares it corona pandemic period  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aparshakti khurana shares helmet scene and compares it corona pandemic period