Good News: अपारशक्ती खुराना लवकरच होणार बाबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aparshakti Khuranna

Good News: अपारशक्ती खुराना लवकरच होणार बाबा

अभिनेता अपारशक्ती खुराना Aparshakti Khuranna हा लवकरच बाबा होणार असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. पत्नी आकृती अहुजासोबतचा Aakriti Ahuja फोटो अपारशक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं. अपारशक्ती आणि आकृतीवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो. अभिनेता कार्तिक आर्यनने सर्वांत आधी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Aparshakti Khuranna wife Aakriti expecting their first child)

या मोनोक्रोम फोटोमध्ये आकृतीचा बेबी बंप दिसून येत असून अपारशक्ती त्याला प्रेमाने किस करत आहे. 'लॉकडाउनमध्ये काम एक्स्पांड होऊ शकलं नाही, म्हणून आम्ही विचार केला की फॅमिलीच एक्स्पांड करूया', असं मजेशीर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. एकता कौल, श्रेया धन्वंतरी, प्रियांक शर्मा, सनी सिंग, जोनिता गांधी, मुकेश छाब्रा यांनी कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: The Family Man 2 Review: मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड समंथाची कामगिरी

अपारशक्ती हा अभिनेता आयुषमान खुरानाचा भाऊ आहे. त्याने आतापर्यंत 'दंगल', 'बद्रिनाथ की दुल्हनियाँ', 'स्त्री' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अपारशक्ती त्याच्या विनोदी अभिनयामुळे ओळखला जातो. त्याने रेमो डिसूझा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर 3डी' या चित्रपटातही काम केलं होतं. त्याची मुख्य भूमिका असलेला 'हेल्मेट' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत प्रनुतन बहल, अभिषेक बॅनर्जी आणि आशिष वर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा: खासगी रुग्णालयावर अभिनेत्रीचा संताप; राजेश टोपेंना केला सवाल

Web Title: Aparshakti Khuranna Wife Aakriti Expecting Their First

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment