अपूर्वा पुन्हा लग्न करणार पण 'या' अटीवर.., म्हणाली,'माझ्या होणाऱ्या नवऱ्याला..' Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar about her marriage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apurva Nemlekar about her marriage in Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4:अपूर्वा पुन्हा लग्न करणार पण 'या' अटीवर.., म्हणाली,'माझ्या होणाऱ्या नवऱ्याला...'

Apurva Nemlekar About Her Marriage: बिग बॉस मराठी सध्या रंजक वळणावर आहे. इथे कधी स्पर्धकांना आपण एकमेकांशी कचाकचा भांडताना पाहतोय तर कधी गळ्यात गळे घालून मैत्री एन्जॉय करताना पाहतोय. या घरात नेहमीच वाद होतात,राडे होतात असं नाही बरं का...इथे अनेकदा डायनिंग टेबलवर,लॉनमध्ये तर कधी अगदीच घराच्या एखाद्या कोपऱ्यात गप्पा मारत बसलेले सदस्य खूप काही बोलून जातात अन् रसिक प्रेक्षक त्याच्यात अलगद रमून जातो. आता अपूर्वाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी कळतेय ...ती देखील तिच्या लग्नाविषयीची. चला जाणून घेऊया सविस्तर. (Apurva Nemlekar about her marriage in Bigg Boss Marathi 4)

बिग बॉसच्या घरात अपुर्वा,अमृृता आणि अक्षय तिघे गप्पा मारत बसले असताना नेमका विषय निघतो लग्नाचा. आता अक्षय आणि अमृताचं लग्न झालं नसलं तरी अपूर्वाचा घटस्फोट झालाय हे आता बऱ्यापैकी अनेकांना माहीत आहे. पण असं असताना लग्न या विषयावर अपूर्वानं बिनधास्त काही वक्तव्य त्या चर्चेत सामिल होत केली आहेत. सुरुवातीला तर अक्षयअपूर्वाला म्हणताना दिसतोय,' तुझं लग्नाचं वय निघून गेलंय तरी विचार करतेयस अजून ...',तेव्हा अपूर्वा पटकन म्हणते,'असं कुणी मिळालं नाही अजून',तेव्हा तिला मध्येच थांबवत अक्षय म्हणतो,' उगाच काहीही ...',मग अपूर्वाही आपल्याला कसा मुलगा हवाय हे सांगताना आपली एक अट बोलून दाखवते.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

अपूर्वा नेमळेकरची लग्नासाठीची अट ऐकाल तर चाट पडाल. म्हणजे फार काही मोठी अट नाहीय ती पण तरिही तुम्हाला थोडा धक्का बसेल. अपूर्वा चक्क म्हणताना दिसते की मला चहा आणि पोहे ज्याला उत्तम करता येतात असा मुलगा हवा. हे ऐकून एकच हशा पिकतो. तेव्हा अमृता देशमुखही आपल्या लग्नाविषयीच्या अटी सांगून मोकळी होते. अभिनय करणाराच हवा असं नाही तर तो कुठल्याही क्षेत्रातला असला तरी चालेल पण माणूस म्हणून चांगला असावा असं अमृता म्हणते. आता यात अधिक चर्चेत आलीय ती अपूर्वाची अट. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यावर तिला 'लग्न कधी करणार?' हा प्रश्न विचारून सगळे हैराण करणार हे नक्की.

अपूर्वाचा पुर्वाश्रमीचा पती हा राजकारणातला,चांगल्या पदावर असलेला मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता. अनेक वर्ष रीलेशनशीपमध्ये राहिल्यावर दोघांनी लग्न केलेलं . पण लग्नानंतर वैचारिक मतभेदांनी डोकं वर काढलं आणि अनेक वर्षाचं प्रेमही काही करु शकलं नाही,दोघांनी विभक्त होण्याचं ठरवलं. आता अपूर्वा लग्नाविषयी पॉझिटिव्ह दिसली खरं, पण कोणाशी लग्न करणार यावरंन चाहते मात्र अंदाज लावू लागलेयत.