Bigg Boss Marathi 4: अपूर्वा जे बोलली ते करूनच दाखवलं.. बिग बॉसही म्हणाले.. यू आर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apurva nemlekar in lady of word first finalist Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: अपूर्वा जे बोलली ते करूनच दाखवलं.. बिग बॉसही म्हणाले.. यू आर..

Bigg Boss Marathi 4: अपूर्वा नेमळेकर... (apurva nemlekar) बिग बॉस मराठीच्या खेळात १०० दिवस चर्चेत राहिलेलं नाव.. ती आली आणि वादळासारखी अख्ख्या घरात वावारली. या घराने तिचं प्रेम पाहिलं तसाच तिचा रागही पाहिला. तिच्या आवाजाने कधी ऊंची गाठत सगळ्यांची बोलती बंद केली तर कधी टास्क मध्ये विजयी होऊन जल्लोष केला. हा खेळ तुम्ही खरे कसे आहात ते दाखवतो. त्यामुळे इथे अनेकांनी खोटं वागण्याचा बनाव केला पण अपूर्वा जशी होती तशीच वागली आणि शेवटपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहिली. म्हणूनच अपूर्वा या सगळ्यात कायमच उजवी ठरलेली दिसली आणि तिचं थेट बिग बॉसनेच कौतुक केलं.

(apurva nemlekar in lady of word first finalist Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: अखेर Top 5 मिळाले!आरोह वेलणकरला दाखवला घरचा रस्ता..

९५ दिवसांचा टप्पा पार करून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून ती थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जेजे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर मेघा, स्नेहलता यांच्याशी प्रेमाचे संबंधही जोपासले. अक्षयवर भावासारखं प्रेम केलं तर विकास आणि तिच्या मैत्रिणे प्रेक्षकांना वेड लावलं. अशी हर हुन्नरी अपूर्वा आता ट्रॉफी पासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे तिने सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा- ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सहाही स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवत आहेत.त्यांचे अभिनंदन करत आहेत. यासाठी बिग बॉसच्या घरातच एक खास सेट उभारण्यात आला आहे, जिथे तो स्पर्धक येताच रोषणाई होते, फटाके फुटतात आणि त्याचे जंगी स्वागत होते. असेच स्वागत अपूर्वाचे झाले. यावेळी तिच्या चाहत्यांनी अक्षरशः जल्लोष केला.

यावेळी बिग बॉसने अपूर्वाचे भरभरून कौतुक केल.. 'या घरात एक अशी स्वाभिमानी स्पर्धक आली.. की ती जे बोलली ते तिने करून दाखवलं.. तिच्या आवाजाने घर दुमदुमलं. तिचा राग जितका वरचा होता तितकीच तिने सर्वांवर माया देखील केली.कधी आईच्या मायेनं प्रत्येकाला जेवू घातलं तर कधी सगळ्यांची काळजी केली. ती कायमच तिच्या शब्दांवर ठाम राहिली. अपूर्वा म्हणजे लेडी ऑफ वर्डस् आहे.' अशा शब्दात बिग बॉसने अपूर्वाचे कौतुक केले.