ए आर रहमानची लेक खातिजाचे दिमाखदार रिसेप्शन.. दिग्गजांची हजेरी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AR Rahman hosts grand wedding reception for daughter Khatija Rahman

ए आर रहमानची लेक खातिजाचे दिमाखदार रिसेप्शन.. दिग्गजांची हजेरी..

A R Rahman daughter : संगीतकार ए. आर. रहमान (A. R Rahman) यांची मुलगी खातिजा रहमान (khatija rahman) हिचा विवाह रियासदीन शेख मोहम्मदशी यांच्याशी 5 मे रोजी पार पडला. ही आनंदाची बातमी ए आर रहमान यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केले होते. परंतु या निकाह सोहळ्यात केवळ मोजक्याच म्हणजे घरच्याच माणसांना त्यांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे नुकतेच त्यांनी मनोरंजन विश्वातील त्यांच्या मित्रांसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. सध्या या रीसेप्शन सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे.

हेही वाचा: सावनी रविंद्रचा दक्षिणात्य अंदाज.. 'या' तेलुगू चित्रपटात गायले गाणे..

खातिजा-रियासदीनचा हा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यानचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गायक यो यो हनी सिंगने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हनी सिंगने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ए आर रहमान यांच्या कुटुंबियांबरोबर पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्री मनिषा कोईरालाही या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित होत्या. खातिजाने रिसेप्शन सोहळ्यात पर्पल रंगाचा भरजरी ड्रेस परिधान केला होता. तिचा या संपूर्ण ड्रेसवर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले होते. तर खातिजाचा पती रियासदीनने काळ्या रंगाचा सुट परिधान केला होता. रियासदीन शेख हा ऑडिओ इंजिनिअर आहे. चेन्नईमध्ये १० जूनला हा रिसेप्शन सोहळा पार पडला असल्याची चर्चा आहे.

Web Title: Ar Rahman Hosts Grand Wedding Reception For Daughter Khatija Rahman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :A. R. Rahman
go to top