'दबंग ३ साठी माफी मागणार नाही'; फ्लॉप चित्रपटावर अरबाजची प्रतिक्रिया

सलमानची मुख्य भूमिका असलेल्या 'दबंग ३' या चित्रपटाची निर्मिती अरबाज खानने केली होती.
Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL
Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL
Updated on

सलमानची मुख्य भूमिका असलेल्या 'दबंग ३' या चित्रपटाची निर्मिती त्याचा भाऊ अरबाज खानने केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात आपटला. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नसला तरी त्यासाठी मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया अरबाजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. "दबंग ३ मध्ये काही गोष्ट योग्यरित्या जमून आल्या नव्हत्या हे मी मान्य करतो. पण नेमकं काय चुकलं होतं हे मी सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही", असं तो या मुलाखतीत म्हणाला. (Arbaaz Khan admits they did not get few things right with Dabangg 3 and not really apologetic about it slv92)

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत तो पुढे म्हणाला, "अनेकांना दबंग ३ हा चित्रपट आवडला नाही. पण मी माझ्या कोणत्याही चित्रपटासाठी माफी मागणार नाही. कारण आम्ही प्रत्येक चित्रपटावर खूप मेहनत घेतो. दबंग ३ ची निर्मिती मी केली आणि प्रभूदेवाचं दिग्दर्शन होतं. सलमानने चित्रपटात चांगली भूमिका साकारली. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, काही चित्रपटांना इतर चित्रपटांइतका यश मिळत नाही. पण यामुळे तुम्ही पुढे चालत राहणं थांबवत नाही. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायला मिळतं. दबंग ३ मध्ये काय चुकलं हे टीमला आणि मला नीट माहितीये. पण मी ते सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही."

Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL
'आमचं घर म्हणजे,भांडणाचा अड्डा आहे का?' सलमान संतापला

'दबंग ३' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातून अभिनेत्री सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सई ही अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com