esakal | 'आमचं घर म्हणजे,भांडणाचा अड्डा आहे का?' सलमान संतापला
sakal

बोलून बातमी शोधा

pinch season 2

'आमचं घर म्हणजे,भांडणाचा अड्डा आहे का?' सलमान संतापला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अरबाज खानचा (arbaaz khan) पिंच (Pinch) नावाचा टॉक शो आहे. तो त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे बॉलीवूडच्या भाईजाननं सलमान खआननं (Salman Khan) त्यात घेतलेला सहभाग. पिंचचा 2 रा (Pinch 2 Promo Out) सीझन आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अनन्या पांडे(Ananya Panday), कियारा अडवाणी (Kiara Advani), आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana), राजकुमार राव (Rajkumar Rao), फराह खान (Farah Khan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) दिसणार आहे. (pinch 2 promo out salman khan reacts to troll calling his home aiyashi ka adda at arbaaz khans show)

पिंचच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे त्याचा दुसरा सीझन देखील पहिल्या भागासारखाच मनोरंजक असेल. अशी भावना दर्शकांची आहे. वेगवेगळ्या सेलिब्रेटींना बोलावणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देणं ही या कार्यक्रमाची प्रमुख रुपरेषा आहे. सध्या जो प्रोमो व्हायरल झाला आहे त्यात बॉलीवूडचे अभिनेता सलमान खान, अनन्या पांडे यांच्याशिवाय आणखी काही सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर पिंचचा प्रोमो सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यावरुन प्रेक्षकांनी अनन्या पांडेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सलमाननं ट्रोलर्सचा आपल्या अंदाजात एक क्लास घेतला आहे. त्या व्हिडिओची सुरुवात अरबाज आणि सलमानच्या बोलण्यानं होते. त्यावेळी अरबाज एका ट्रोलर्सची कमेंट सलमानला वाचून दाखवतो. जनतेचा देव होण्याची गरज नाही. तसा प्रयत्न करु नको. ही ती कमेंट असते. त्यावर सलमान म्हणतो, बरोबर आहे. एकच देव आहे आणि मी तो नाही. अरबाज त्यावर त्याला आणखी दुसरी एक कमेंटही वाचून दाखवतो. त्या कमेंट्सला उत्तर देताना सलमान म्हणतो, या भावाला असं आमच्या घरात काय दिसलं की त्याला आमचं घर भांडणाचा अड्डा वाटायला लागला. हा प्रश्न सलमाननं केला आहे.

हेही वाचा: प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हेही वाचा: 'दिवस वाईट,पैसे संपले, घरच्यांनी सोडलं: ज्येष्ठ अभिनेत्रीची खंत

अनन्या पांडे आपल्या कॉमेंट्सवर प्रतिक्रिया देताना म्हणते की, मला फेक पांडे कोण कसं बोलू शकतो. फराह खाननं ट्रोलर्सला नेपोटिझमवर सणसणीत उत्तर दिलं आहे. ती म्हणते, तुम्ही म्हणता, नेपोटिझम आहे, मात्र तुम्हाला तर शाहरुखच्या मुलाचे किंवा मुलीचे फोटो, तसेच करिनाच्या मुलाचे फोटो पाहायचे असतात. अनन्या म्हणते, मला आता स्ट्रगलिंग दीदी का म्हणतात हे कोणी सांगेल का?

loading image