Archana Gautam : 'मला अन् वडिलांना मारण्यासाठी....' बिग बॉस फेम अर्चनानं प्रियंका गांधींवर केला मोठा आरोप

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. सर्वाधिक टीआऱपी मिळवणारा शो म्हणूनही बिग बॉसकडे पाहिले जाते.
Archana Gautam tv entertainment actress Allegations
Archana Gautam tv entertainment actress Allegations esa

Archana Gautam tv entertainment actress Allegations : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. सर्वाधिक टीआऱपी मिळवणारा शो म्हणूनही बिग बॉसकडे पाहिले जाते. अशा या रियॅलिटी शो मधून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांबाबत मोठी क्रेझ नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या मनात असते. आता याच बिग बॉसमधील एका स्पर्धकानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

बिग बॉसच्या १६ आणि खतरो के खिलाडीच्या १३ व्या सीझनमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अर्चना गौतमनं कॉग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील अर्चनानं तिच्या परखड स्वभावाचा परिचय कित्येक सेलिब्रेटींना करुन दिला आहे. त्यामुळे ती चर्चेतही आली आहे. अर्चनानं २०२१ मध्ये काँग्रेस प्रवेश केला होता.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

अर्चनाचे कॉग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यासगळ्यात तिनं प्रियंका गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे. गेल्या वर्षी अर्चना गौतम आणि तिचे वडील यांना दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण करण्यात आली होती. आता अर्चनाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात तिनं काँग्रेसची पोलखोल केली आहे.

Archana Gautam tv entertainment actress Allegations
Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

अर्चनानं त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी दिल्लीमध्ये होते तेव्हा प्रियंका गांधी यांना भेटण्याचा विचार करत होते. त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. मी आणि माझे वडील आम्ही कार्यालयात गेलो. मात्र आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर आमच्यावर हल्ला झाला होता. मला दीदींना विचारायचे आहे की, तुम्ही शांत का आहात, मी नेहमीच आपल्या पक्षासाठी भूमिका घेतली आहे आणि आता मला गरज आहे तेव्हा कुणीही नाही.

मला पक्षातून का बाहेर काढण्यात आले, मी तर कधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. त्या व्हिडिओमधून दिसून येईल की, मला कशाप्रकारे मारहाण करण्यात आली आहे ते. मला आणि माझ्या वडिलांना मारहाण झाली. आता सगळे कुठे गेले, कुठे आहेत प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे अशा शब्दांत अर्चनानं तिचा राग व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com