
दीपिका रणवीरच्या घरी येणार नवीन पाहुणा? पोस्ट चर्चेत
कायम चर्चेत असणारं बॉलीवूडमधील कपल दीपिका रणवीरच्या ऑन आणि ऑफ स्क्रिन रोमांसचे चर्चे सगळीकडेच असतात.दीपिकाची ओळख बॉलीवूडमधल्या एका दिग्गज अभिनेत्रीमधे केलं जातं तर रणवीरनेही त्याच्या अनेक चित्रपटांतील अभिनयातून त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.अलीकडे रणवीर त्याच्या 'जयेशभाई जोरदार' या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमधे व्यस्त आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर कळल्यानंतर सर्वांना आता शंका येत आहे.रणवीर सिंह हा सध्या त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.(Deepika Padukone) जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे.त्याला मुलाखतीत त्याच्या बाळाबद्दल तसेच नावाबद्दल विचारण्यात आले होते.‘जर भविष्यात तुला आणि दीपिकाला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावर “मी बाळाच्या नावाची एक लांबलचक यादी तयार केली आहे. पण एवढ्यात मी ती नावं उघड करणार नाही.”अले तो म्हणाला.
"मला लहान मुले प्रचंड आवडतात.त्यांची नावे युनिक असावी असं मला वाटतं.याची एक यादीदेखिल मी बणवून ठेवली आहे.पण मी ती इतक्यात उघड करणार नाही.या नावांविषयी माझी आणि दीपिकाची अनेकदा चर्चाही झाली आहे.ही नावे कोणी दुसऱ्याने चोरू नये म्हणून त्याने ही नावे गुपित ठेवली असल्याचे त्याने सांगितले.‘तुला मुलगा हवा की मुलगी?’ असा प्रश्न रणवीरला विचारला असता “मुलगी असो किंवा मुलगा तो देवाचा खरा आशीर्वाद असतो.(Ranveer Singh) त्यामुळे मला काहीही झाले तरी चालेल."असेही तो म्हणाला.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.”रणवीरच्या मुलाखतीतील उत्तरांनी हे कपल गूड न्यूज देणार का याची नेटकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Title: Are Bollywood Couple Ranveer And Deepika Giving Good News Of Deepikas Pregnancy News Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..