
Arijit Singh: 'रंग दे तू मोहे गेरुआ' गाण्याच्या वादावरुन अखेर अरिजीत बोललाचं, 'अरे भगवा रंग हा'
प्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय पार्श्व गायक आणि संगीत निर्माता अरिजित सिंह हा त्याच्या मधुर आवाजासाठी ओळखला जातो. त्याचा भावपूर्ण आवाज आणि अष्टपैलू गायनच्या शैलीने तो प्रेक्षकांवर मोहिनीच पसरवतो. त्याने अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली आहेत. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचं 'रंग दे तू मोहे गेरुआ' हे लोकप्रिय गाणं वादात सापडलं होतं. या गाण्यामुळे त्याचा कोलकात्यामधील शो रद्द करण्यात आला होता.
कोलकातामधील इको पार्कमध्ये तो शो होणार होता. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरिजितला 'रंग दे तू मोहे गेरुआ' गाण्यास मनाई केली होती. त्याचा फटका त्याला बसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर अरिजित सिंहने यावर काही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.
मात्र त्याने आता या संदर्भात त्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर तो म्हणाला का, 'एका रंगावरून इतका वाद! भगवा रंग हा स्वामी विवेकानंद यांच्या संन्याशी लोकांचा आहे. त्यांनी जर पांढरा रंग परिधान केला असता तर त्यावरूनदेखील वाद झाला असता का? '
हा सर्व वाद शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावरून सुरु झाला होता. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील भगव्या बिकिनीवरुन जोरदार वाद झाला होता. त्यामुळेच अरिजीतलाही ट्रोल करण्यात आलं होत आणि यामुळेच त्याचा शो रद्द करण्यात आला होता असंही बोललं जात होतं.