Bigg Boss 16 मध्ये प्रियंका चौधरीची फी दुप्पट केल्याबद्दल अर्जुन बिजलानी म्हणाला...

प्रियांका चहरने शोच्या मध्यभागी तिची फी वाढवल्याच्या वृत्तावर अर्जुन बिजलानीने प्रतिक्रिया दिली आहे.
Arjun Bijlani and Priyanka Chahar Choudhary
Arjun Bijlani and Priyanka Chahar Choudhary Sakal

'उदारियां' फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी ही 'बिग बॉस 16' मधील टॉप स्पर्धकांपैकी एक आहे. प्रियांकाकडे सुरुवातीपासूनच फायनल म्हणून पाहिले जात आहे. प्रियांका चहरची 'बिग बॉस'मध्ये फी वाढवल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. या बातम्या समोर आल्यानंतर आता टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चहरने शोच्या मध्यभागी तिची फी वाढवल्याच्या वृत्तावर अर्जुन बिजलानीने प्रतिक्रिया दिली आहे. आता ती सुंबुल तौकीर खानपेक्षा जास्त पैसे घेत आहे. यावर अभिनेत्याने ट्विट केले आणि लिहिले, "मला सांगितल्याबद्दल धन्यवाद ,की शोच्या मध्यभागी फी वाढवली आहे आणि तीही दुप्पट, सुन रहे हो अ‍ॅक्टर्स".

आम्ही तुम्हाला सांगतो की, दरवर्षी जेव्हा जेव्हा 'बिग बॉस'च्या स्पर्धकांची चर्चा होते तेव्हा अर्जुन बिजलानीचे नावही समोर येते. अर्जुनचे चाहते त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार, अर्जुनला अनेकवेळा शोमधून ऑफरही आल्या होत्या, पण त्याने कधीच स्वीकारल्या नाहीत. आता अर्जुनचे हे ट्विट पाहून असे दिसते की फी वाढीनंतर अर्जुनही शोमध्ये जाण्याचा विचार करत आहे.

Arjun Bijlani and Priyanka Chahar Choudhary
RRR Oscar : 'माझ्या चित्रपटाला ऑस्कर मिळणारच!' राजामौलींनी सांगितलं कारण

प्रियंका चहर ही सर्वात जास्त पसंतीची स्पर्धकांपैकी एक आहे. असे म्हटले जात आहे की 'इमली' फेम सुंबूल तौकीरला या शोमध्ये सर्वाधिक फी मिळत होती, परंतु ती शोमध्ये फारशी सक्रिय नसल्याने तिची फी अर्धी करण्यात आली आहे. पूर्वी तिला दर आठवड्याला 11 लाख रुपये मिळत होते. त्याच वेळी प्रियांकाला दर आठवड्याला 5 लाख रुपये मिळत होते, परंतु लेटेस्ट अहवालानुसार, आता प्रियांकाला दर आठवड्याला 10 लाख रुपये मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com