'माझ्या चित्रपटाला ऑस्कर मिळणारच!' राजामौलींनी सांगितलं कारण | RRR Oscar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Oscar

RRR Oscar : 'माझ्या चित्रपटाला ऑस्कर मिळणारच!' राजामौलींनी सांगितलं कारण

RRR VS Chhello Show : जगभरामध्ये ज्या चित्रपटाचा सर्वाधिक डंका आहे त्या अवतारच्या दिग्दर्शकानं जेम्स कॅमेरुन यांनी आरआरआऱच्या दिग्दर्शकाचं एस एस राजामौली यांचे कौतूक केले होते. आपण जे काही पाहिलं ते अविस्मरणीय होते. त्याचा आनंद हा एखाद्या महासागरासारखा आहे. अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

यासगळ्यात आता राजामौली यांची आणखी एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या चित्रपटाला ऑस्कर मिळणारच. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरआरआर हा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होता. त्यातील गाण्याला नाटू नाटूला गोल्डन गोल्ब मिळाल्यानं ऑस्करची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

Also Read - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

यापूर्वी देखील आरआरआऱवर कौतूकाचा वर्षाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील नाटू नाटू गाण्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील त्याचे कौतूक केले आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्ट झाल्यानं चाहत्यांनी आनं व्यक्त केला आहे. आता केवळ ऑस्करचीच प्रतिक्षा असल्याचे म्हटले जात आहे. यावर राजामौली यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

राजामौली हे सध्या अमेरिकेमध्ये आऱआरआऱचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. त्यांनी म्हटले आहे. माझा आरआऱआऱ हा चित्रपट छेलो शो पेक्षा प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. मी माझा चित्रपट आणखी ऑस्करच्या सदस्यांपर्यत पोहचवण्याचा पूर्णपणे प्रयत्नही करतो आहे. तेव्हा मला अशी आशा आहे की, येत्या काळात आरआरआरला ऑस्कर मिळेल.

हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

मुळात मला एका गोष्टीचे वाईट वाटते आहे की, आरआरआरची भारताकडून ऑफिशियल ऑस्करच्या इंट्रीसाठी निवड झालेली नाही. त्याचे कारणही मला मिळालेले नाही. ज्या चित्रपटाला साऱ्या जगभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे त्याला आपल्या देशाकडूनच नाकारण्यात आले होते. यावर ज्युनिअर एनटीआरनं देखील प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'