Arjun Kapoor birthday : 'तू 38, ती 49 अर्जून 'अजून' किती थांबणार'?

मलायका आणि अर्जून कपूरची जोडी ही बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. अर्जूननं मलायकासोबत लग्न करावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे.
Arjun Kapoor birthday wedding
Arjun Kapoor birthday weddingesakal
Updated on

Arjun Kapoor birthday wedding : मलायका आणि अर्जून कपूरची जोडी ही बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. अर्जूननं मलायकासोबत लग्न करावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे. मलायकाच्या फॉलोअर्सनं तिला यापूर्वी लग्नावरुन विचारले होते. त्यावर तिनं येत्या काळात तुम्हाला गुड न्यूज मिळेल असे म्हटले होते.

आज अर्जून कपूरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जून ३८ वर्षांचा झाला आहे. मलाययकानं केव्हाच चाळीशी पार केली आहे. अशात या दोन्ही सेलिब्रेटींनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची गेल्या कित्येक दिवसापासूनची इच्छा आहे. अर्जूननं यावर जाहीरपरणे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा कित्येक वर्षांपासून आहेत.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयानं अर्जूननं वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला भलेही बॉलीवूडच्या इतर अभिनेत्यांसारखे स्थान मिळाले नसेल मात्र त्यानं त्याचा प्रयत्न काही थांबवलेला नाही. वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटातून अर्जून चमकला आहे. त्याचा अभिनय चाहत्यांच्या चर्चेचा विषयआहे. सोशल मीडियावर अर्जून हा वेगवेगळ्या विषयांवरुन ट्रेंडिंग असतो.

मलायकानं तिच्या मुव्हिंग विथ मलायका नावाच्या माहितीपटामध्ये तिच्या रिलेशनशिपवरुन खुलासा केला होता. तिला संकटाच्या काळात अर्जूननं दिलेली साथ किती मोलाची होती याविषयी तिनं सांगून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये मलायकानं तिच्या आणि अर्जूनच्या लग्नावरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले होते.

Arjun Kapoor birthday wedding
Adipurush Virender Sehwag: सगळ्यांचं झालं आता विरु पाजीनं आदिपुरुषला सुनावलं... एका वाक्यात विषय संपवला

कोणत्या चित्रपटात करतोय काम....

अर्जूनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो द लेडी किलर नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट मेरी पत्नी का....नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यानंतर तो कोमाली नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असून त्यात अमृता पुरी आणि मनोज वाजपेयीही दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते अर्जूनच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com