चार महिन्यांनतर शूटसाठी बाहेर पडला अर्जुन कपूर, लोकेशनवरचे फोटो केले शेअर..

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Saturday, 11 July 2020

सेलिब्रिटी शूटींगसाठी घरातून बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी तर शूटींगला सुरुवात देखील झाली आहे.  नुकतंच बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही शूटींगला सुरुवात केली आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे चार महिन्यांपासून शूटींग ठेवण्यात आलं होतं. मात्र आता हळूहळू अनलॉक करत असताना शूटींगही सुरु करण्यात आली आहेत. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी घरातून बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी तर शूटींगला सुरुवात देखील झाली आहे.  नुकतंच बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही शूटींगला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा: निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतोय सलमान खान, शेराने केला मालकाचा व्हिडिओ शेअर

अभिनेता अर्जुन कपूर शूटींगसाठी सेटवर येणा-या पहिल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याने स्वतः कामाला सुरुवात तर केली आहे आणि दुस-यांनाही काम सुरु करण्यासाठी सल्ला देत आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. अर्जुनने लिहिलंय, प्रत्येकाला आता या न्यु नॉर्मल आयुष्यासोबत ऍडजस्ट करणं गरजेचं आहे आणि हळूहळू आपलं जीवन पुन्हा एकदा जगायला सुरुवात केली पाहिजे. माझी वर्क लाईफ चार महिन्यांनतरसग आज पुन्हा एकदा सुरु झाली आहे. सगळं बदललं आहे. नवीन जगाने दिलेल्या या ऑर्डरचा मी स्विकार केला आहे. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अर्जुनने खुलासा केला आहे की 'कमर्शिअल शूटच्या सेटवर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेच्या उपायांमुळे मला अगदी सहज वाटलं.  मी सुरुवातीला थोडा घाबरलो होतो आणि बेचैन देखील होतो. मात्र सुरक्षेचे सगळे उपाय पाहून मी लगेच नॉर्मल झालो.

स्वाभाविक आहे की पुन्हा एकदा काम सुरु करताना आपल्या मनात भिती ही असणारंच. मात्र आज मी शूटींग करत असल्यामुळे आणि इथे हजर असलेल्या लोकांना पाहून निर्धास्त झालो. मी हे यासाठी म्हणतोय कारण मी ही एवढी मोठी तयारी पाहिली आहे जी हे निश्चित करण्यासाठी करत आहेत की सेटवर आमच्या सुरक्षेचे उत्तम उपाय असतील.'

arjun kapoor came out for shooting after four months in unlock of coronavirus pandemic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arjun kapoor came out for shooting after four months in unlock of coronavirus pandemic