Ranbir Kapoor: तुला चाळीस वर्ष मी सांभाळलं आणि आज तू.. रणबीरसाठी अर्जुन कपूरची पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor drops quirky post for Ranbir Kapoor on his birthday

Ranbir Kapoor: तुला चाळीस वर्ष मी सांभाळलं आणि आज तू.. रणबीरसाठी अर्जुन कपूरची पोस्ट

Ranbir Kapoor Birthday: अभिनेता रणबीर कपूरचा (ranbir kapoor) आज चाळीसावा वाढदिवस आहे. रणबीरसाठी खरं तर हे वर्ष खूपच खास आहे. कारण याच वर्षी रणबीर आलिया भट्टसोबत विवाह बंधनात अडकला. लवकरच तो बाबाही होणार आहे. शिवाय एकीकडे बड्या बड्या कलाकारांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असताना रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरलाय. वाढदिवसानिमित्त रणबीरवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच रणबीरचा जवळचा मित्र आणि त्याचा चुलत भाऊ अर्जुन कपूरने खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्यात. अर्जुनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. (Arjun Kapoor drops quirky post for Ranbir Kapoor on his birthday)

अर्जुनने इन्स्टाग्रामवर रणबीरसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, "चाळीस वर्ष तुला असं कुशीत घेऊन मी मोठं केलं आणि आज तू अग्नी बनलास, अभिमान वाटतो तुझा पोरा." अर्जुन कपूरने लिहिलेलं हे मजेशीर कॅप्शन चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडतंय. चाहते फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

तू माझं शक्ती अस्त्र...

आलिया भट्ट तसंच करीना कपूर आणि करिश्मा कपूरसह कपूर कुटुंबीयांनी रणबीरला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आई नीतू कपूर यांनी देखील रणवीरसोबतचा एक खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हे वर्ष तुझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठीच खूप खास आहे. तुझ्या वडिलांची आठवण येते. कारण त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. ते तिथे वर आनंद साजरा करत असतील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझं शक्ती अस्त्र आहेस." असं नीतू कपूर यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय. नीतू कपूर यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.