Singham Again: "लेकिन अब जो आएगा, वो शैतान है!"; 'सिंघम अगेन' मधील अर्जुनचा खतरनाक लूक पाहिलात?

Singham Again: सिंघम अगेन या चित्रपटातील अर्जुनचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अर्जुनच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Singham Again
Singham Again

Singham Again: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट मोठी आहे. 'सिंघम अगेन' मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार काम करणार आहे. अशताच आता या चित्रपटात अर्जुन कपूरची एन्ट्री झाली आहे. सिंघम अगेन या चित्रपटातील अर्जुनचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अर्जुनच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अर्जुन कपूरचा खतरनाक लूक

'सिंघम अगेन' चित्रपटातील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. रोहित शेट्टीने अर्जुनच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. यामधील एका फोटोमध्ये अर्जुन कपूरच्या हातात कोयता दिसत आहे तसेच चेहरा रक्तानं माखलेला दिसत आहे. रोहितनं शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये रणवीर आणि अर्जुन आमने-सामने दिसत आहेत. हे दोन फोटो शेअर करुन अर्जुननं कॅप्शनमध्ये लिहिले,"इंसान गलती करता है और उसे उसकी सजा भी मिलती है...लेकिन अब जो आएगा, वो शैतान है! इंट्रोड्यूसिंग अर्जुन कपूर!'

अर्जुननं सिंघम अगेन चित्रपटातील त्याच्या लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "सिंघमचा खलनायक! हिट-मशीन रोहित शेट्टी सरांच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग होऊन खूप आनंद होत आहे!"

Singham Again
Singham Again: पुन्हा घुमणार डरकाळी! गुन्हेगारांचा थरकाप उडवणाऱ्या अजय देवगणचा सिंघम लूक पाहाच

'सिंघम अगेन' ची स्टार कास्ट

दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर, अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com