Panipat : सगळं लै भारी, पण अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत??

टीम ईसकाळ
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पानिपतचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अर्जूनला सदाशिवरावांच्या भूमिकेत बघून काही नेटकरी निराश झाले आहेत. अर्जूनचा ट्रेलरमधील अभिनय पाहून काहींना तो खटकू लागलाय. अर्जूनच्या या कास्टींगमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय.

गेले अनेक दिवस प्रतिक्षित असलेल्या 'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या घनघोर लढाईची कहाणी सांगणार पानिपत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर साकारत आहेत. या चित्रपटात सदाशिवराव पेशव्यांच्या मुख्य भूमिकेत अर्जून कपूर दिसतोय, पण ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अर्जूनला सदाशिवरावांच्या भूमिकेत बघून काही नेटकरी निराश झाले आहेत. अर्जूनचा ट्रेलरमधील अभिनय पाहून काहींना तो खटकू लागलाय. अर्जूनच्या या कास्टींगमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय. 

Panipat Trailer : 'मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तय्यार हूँ!'

 

पानिपतमध्ये अर्जूनसह संजय दत्त, कृती सेनन, मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, झीनत अमान, सुहासिनी मुळ्ये, गश्मीर महाजनी अशी तगडी स्टारकास्ट दिसत आहे. पण नेटकऱ्यांना सदाशिवरावांच्या भूमिकेतला अर्जून काही केल्या पसंत पडत नाहीये. त्यामुळे आशुतोष गोवारीकराच्या कास्टींगवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अर्जूनची रणवीरसिंग आणि हृतिकशी तुलनाही करण्यात येत आहे. 

 

 

चित्रपटाच्या इतर बाजू अत्यंत दमदार आहेत. पण केवळ अर्जून कपूरच्या अभिनयामुळे या चित्रपटाचे भविष्य काय असेल यावर सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. उत्तम मेकअपमुळे तो सदाशिवरावांसारखा दिसत असला तरी तसा रूबाब, करारीपणा आणि शौर्य आपल्या अभिनयातून साकारू शकेल का यावर शंका उपस्थित केली जात आहे. 

 

 

असा आहे ट्रेलर...
तीन मिनिटे चौदा सेकंदाचा हा ट्रेलर पुन्हा आपल्याला पानिपतच्या त्या युद्धभूमीवर घेऊन जातो. मराठ्यांनी सांडलेलं रक्त, बाजीराव पेशव्यांनी पानिपतच्या लढाईसाठी सदाशिवरावांची केलेली निवड, सुख-दुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी पार्वतीबाई व करारी नजरेने समोर उभा ठाकलेला अहमद शाह अब्दाली! या सगळ्याची सांगड घालत युद्धभूमीवरच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी आकर्षण असेल. 'मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है', 'सुख मे आपके पिछे व दुःख में आपके आगे खडी रहूंगी' असे दर्जेदार डायलॉग या ट्रेलरमध्ये दिसतायत. 6 डिसेंबरला पानिपत सर्वत्र प्रदर्शित होईल.   

   

 

'पानिपतची तिसरी लढाई'
पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होती.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Kapoor gets troll on Social Media for role of Sadashivrao in Panipat