esakal | अर्जुनने सांगितली शाळेतील कटू आठवण; 'नव्या आईवरुन चिडवायचे मित्र'
sakal

बोलून बातमी शोधा

arjun kapoor,sridevi , boney kapoor

अर्जुनने सांगितली शाळेतील कटू आठवण; 'नव्या आईवरुन चिडवायचे मित्र'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा त्याचे कुटुंब आणि रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो. अर्जुन हा बोनी कपूर (Boney Kapoor) आणि मोना शौरी कपूर (Mona Shourie Kapoor) यांचा मुलागा आहे. अर्जुनला अंशुला ही एक बहीण देखील आहे. अर्जुनच्या आईचे 25 मार्च 2012 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi)) यांच्यासोबत लग्न केले. बोनी आणि श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर शाळेतील आठवणींबद्दल अजुनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. (arjun kapoor recalls his best friends in school asking about his new mom sridevi)

मुलाखतीमध्ये अर्जुनने सांगितले, 'तेव्हा मला खूप मनस्ताप झाला होता. मी लहान असताना माझ्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यामुळे मी विभक्त कुटुंबात लहानाचा मोठा झालो. त्यावेळी तसे राहणे खूप कठीण होते. कारण माझे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. माझ्या वडिलांनी अशा महिलेसोबत लग्न करायचे ठरवले होते, ज्या खूप मोठ्या स्टार होत्या. त्यांना सर्वजण ओळखत होते. त्यामुळे मी शाळेत असताना माझे मित्र मला विचारायचे की, 'तुझी नवी आई (श्रीदेवी) कशी आहे?' असे विचारून ते मला चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटत होते. हे मी सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत नाहीये. पण हे सत्य आहे.'

हेही वाचा: सहा महिन्यांची झाली वामिका; अनुष्काने शेअर केले खास फोटो

काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्जुनचे 'सरदार का ग्रँडसन' आणि 'संदीप और पिंकी फरार' हे चित्रपट प्रदर्शित झाले. लवकरच तो मोहित सूरी यांच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यात दिशा पटानी, तारा सुतारीया आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा: आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर

loading image