esakal | आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Kamal Sadanah

आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता आमिर खाननंतर Aamir Khan बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एका अभिनेत्याने पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 'बेखुदी' या चित्रपटात काजोलसोबत Kajol भूमिका साकारणारा अभिनेता कमल सदानाने Kamal Sadanah पत्नी लिसा जॉनपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २००० साली या दोघांचं लग्न झालं होतं. २१ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. "दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. अशा घटना सर्व ठिकाणी घडत आहेत आणि आम्हीसुद्धा त्यातीलच एक आहोत", असं कमल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला. (Kajols Bekhudi co star Kamal Sadanah to divorce Lisa John after 21 years of marriage)

कमल आणि लिसा यांनी १ जानेवारी २००० रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना मुलगा अंगद आणि मुलगी लिया आहे. लिसा ही मेकअप आर्टिस्ट असून ती सध्या गोव्यात तिच्या आईवडिलांसोबत राहतेय.

कमलने १९९२ साली 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने काजोलसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर 'रंग' या हिट चित्रपटातही त्याने काम केलं. ९०च्या दशकातील इतरही काही चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. २०१४ साली कमलने 'रोअर' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात अभिनव शुक्ला, हिमर्शा, सुब्रत दत्ता, विरेंद्र सिंग, घुमन आणि अली कुली मिर्झी यांच्या भूमिका होत्या.

हेही वाचा: घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण

'रोअर' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी कमल सदानाने एका मुलाखतीत पत्नीचं भरभरून कौतुक केलं होतं. "लिसाशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि त्यानंतर रोअर चित्रपटाची निर्मिती हा माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वोत्कृष्ट निर्णय आहे. अभिनयात माझं मन रमत नव्हतं. त्यामुळे त्यापासून मला ब्रेक मिळाल्याचा आनंदच आहे", असं तो म्हणाला होता.

२००७ साली कमलने 'व्हिक्टोरिया नंबर २०३ : डायमंड्स आर फोरेव्हर' या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या 'व्हिक्टोरिया नंबर २०३' या चित्रपटाचा हा रिमेक होता. दिवंगत चित्रपट दिग्दर्शक ब्रिज सदाना हे कमल सदानाचे वडील होते.

loading image