'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं'; अर्जुनचा टोमणा कोणाला? Arjun Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor

'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं'; अर्जुनचा टोमणा कोणाला?

अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) नेहमीच त्याच्या कुटुंबीयांविषयी, नातेसंबंधांविषयी स्पष्टपणे व्यक्त होताना पाहिलं गेलंय. अर्जुनची सावत्र आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि त्याच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर यांच्याविषयी तो अनेक मुलाखतींमध्ये व्यक्त झाला. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून त्याच्या या पोस्टमध्ये त्याने पुन्हा एकदा नातेसंबंधांचा, कुटुंबाचा उल्लेख केला आहे. 'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं', असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

अर्जुन कपूरची पोस्ट-

'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं. कुटुंब म्हणजे अशी लोकं, ज्यांना तुम्ही त्यांच्या आयुष्यात हवे आहात. तुम्ही आहात तसे तुमचा स्वीकार करणारी लोकं म्हणजेच कुटुंब. जे तुमचं हास्य पाहण्यासाठी काहीही करतील आणि काहीही झालं तरी ते तुमच्यावर प्रेम करतील,' असं अर्जुनने लिहिलं आहे.

हेही वाचा: 'ज्या नात्यात आदर नसेल..'; सुष्मिताने सांगितलं ब्रेकअपचं कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन त्याच्या बहिणींविषयी व्यक्त झाला होता. त्यानंतर त्याने लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका वेब साइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, 'चांगली बाब म्हणजे ते माझा सन्मान करतात आणि मी त्यांचा आदर करतो. मी अनेकदा त्यांची मस्करी करतो, कारण माझा स्वभावच तसा आहे. आम्ही एकत्र राहत नसल्याने दररोज आयुष्यात काय घडतं याबद्दल आम्ही एकमेकांना सांगत बसत नाही. एका छताखाली राहणारं आमचं खुशाल कुटुंब आहे आणि आम्ही सर्व गोष्टी एकमेकांना सांगतो, असं खोटं चित्र मला लोकांसमोर निर्माण करायला आवडत नाही. मी लोकांना त्यांच्या इच्छेनुसार वागू देतो.'

अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला ही बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलं आहेत. तर जान्हवी आणि खुशी या बोनी कपूर आणि त्यांची दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मुली आहेत.

Web Title: Arjun Kapoor Shares Cryptic Message On Instagram Family Is Not Always Blood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top