Arjun Kapoor: सावत्र असली तरी बहिण आहे नं...जान्हवी विषयी असं कसं काय बोलू शकतो अर्जुन कपूर? Janhvi Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor, Janhvi Kapoor

Arjun Kapoor: सावत्र असली तरी बहिण आहे नं...जान्हवी विषयी असं कसं काय बोलू शकतो अर्जुन कपूर?

Arjun Kapoor: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या आपल्या अभिनयापेक्षा अधिक बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली पहायला मिळाली. जान्हवी आपले एक एक असे हॉट फोटो शेअर करते की ते पाहून इंटनेटचा पारा वाढताना दिसतो.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर विषयी तिचा सावत्र भाऊ अभिनेता अर्जुन कपूरनं अशी काही विधानं केली आहेत जी जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

एवढंच नाही तर अर्जुन कपूरने आपल्या या मुलाखतीत लेडी लव्ह मलायका अरोरा संदर्भातही अशा काही गोष्टी बोलून दाखवल्यात की आपण शॉक व्हाल.(Arjun Kapoor Shocking Comment on Janhvi Kapoor)

हेही वाचा: Ved Movie: भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असं घडणार, 'वेड'चा रितेश प्रेक्षकांसाठी आणतोय...

अर्जुन कपूरनं एका मुलाखतीत अगदी मनमोकळा संवाद साधत आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील मोठे खुलासे केले आहेत. अर्जुन कपूरनं बहिण जान्हवी कपूर विषयी बोलताना म्हटलं आहे की- ''जान्हवी कपूर खूपच इनसिक्योर आहे आणि कामाची भुकेलेली आहे. तिला आपल्या क्षमतेवर अजिबात विश्वास नाही. आणि याच कारणामुळे ती कायम टेन्शनमध्ये असते''.

पुढे अर्जुन कपूर म्हणाला की, ''आपण कोणाची मुलगी आहोत या गोष्टीत ती अधिक सुखी-समाधानी आहे. अर्थात हे गरजेचं देखील आहे. तिला स्वतःला खूप खंबीर बनावं लागेल. पण एवढं नक्की सांगेन की तिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ती रिस्क घेण्यापासून घाबरत नाही. आम्ही दोघं जेव्हा पण एकत्र येतो तेव्हा सिनेमांविषयी भरपूर गप्पा मारतो''.

या मुलाखतीत अर्जुन कपूरनं आपली लेडी लव्ह मलायका अरोरा विषयी देखील संवाद साधला. तो म्हणाला,''आम्ही एकमेकांच्या आयु्ष्यात एकदम फिट बसतो. लोकांना वाटतं की आमचं नातं खूप वेगळं आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की मी तिच्यासोबत असताना खूश राहू शकतो, मी आनंदात झोपू शकतो आणि आनंदात उठू शकतो''.