‘पानिपत'साठी अर्जून कपूरचा शर्टलेस लूक !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 June 2019

अर्जून कपूर सध्या मलायका अरोराशी असलेल्या कथित अफेरच्या चर्चेत असला तरी आता ही चर्चा मागे पडून अर्जूनच्या बॉडीबिल्डींगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 

सध्या अर्जुन कपूर त्याचा आगमी चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटातील योध्द्याच्या भूमिकेसाठी अर्जुन जीममध्ये घाम गाळत आहे. आपली शरीरयष्टी त्याने बदलली असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

हे फोटो पाहता अर्जुनने चित्रपटातील भूमिकेसाठी वजन वाढवले असल्याचे दिसत आहे. पण तरी अर्जून फिट दिसतोय. एखाद्या पैलवानाची शरीरयष्टी असावी अशी त्याची शरीरयष्टी दिसत आहे. हे शर्टलेस फोटो जीममधील आहेत.

नुकताच अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुनने शर्ट परिधान नाही. फोटो शेअर करताना ‘Warrior mode on! #Panipat’ असे कॅप्शन त्याने दिले आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर करत आहेत. अर्जून सोबतच या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, पद्मिनी कोल्हापूरे आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.  6 डिसेंबर 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते.

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Serial Chiller.

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Kapoors first new look for Panipat Film