सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण| Sapna Chaudhary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sapna Chaudhary

सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हरयाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे Sapna Choudhary जगभरात चाहते आहेत. सपनाच्या डान्स आणि अदांमुळे ती चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. तिच्यावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अ‍ॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी वॉरंट जारी केलं असून त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

हे प्रकरण तीन वर्षे जुनं आहे. सपना विरोधात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता. आता याप्रकरणात लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

Sapna Choudhary

Sapna Choudhary

हेही वाचा: सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज माध्यमांसमोर ढसाढसा रडली

१३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा एक कार्यक्रम होणार होता. यासाठी ३०० रुपये तिकीट शुल्क आकारण्यात आलं होतं. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकीटांची विक्री करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पण रात्रीचे १० वाजले तरीही सपना चौधरी आलीच नाही आणि त्यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांना तिकीटाचे पैसेही परत केले गेले नाहीत. याप्रकरणात कोर्टाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला होता.

loading image
go to top