'बिग बॉस' फेम आरतीचा एक महिन्यात बदललेला हा लूक पाहिलात का?

aarti
aarti

मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. देशातील कोरोना विषाणूचं संकट दूर करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, पोलिस हे आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सगळेच लोक घरीच थांबून सोशल डिस्टंन्सिंग पाळत आहेत. संपूर्ण जगात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. चित्रीकरण बंद असल्याने या क्वारंटाईन दिवसात कलाकार ही नवनवीन गोष्टी करत स्वतःच मनोरंजन करत आहेत. कोणी भांडी घासत, कोणी वर्कआऊट करत आहे तर कोणी आपल्या कुटुंबासोबत मौल्यवान वेळ घालवत आहेत. अशातच 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री आरती सिंह या क्वारंटाईनमध्ये तिच्या फिटनेसवर जास्त लक्ष देताना दिसते आहे. 

आरती सिंहने या लॉकडाऊनमध्ये एक महिन्यात 5 किलो वजन कमी केलं आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एक महिन्यापूर्वी कशी होती आणि आता कशी आहे, असा बिफोर-आफ्टरचा हा फोटो आहे. ज्यामध्ये महिन्याभरात तिचं बेली फॅट कमी झाल्याचे दिसून येत आहे. तिचा पहिला फोटो 15 मार्चचा आहे आणि दुसरा फोटो आताच्या दिवसांचा आहे. यामध्ये तिने बेली फॅट कमी केले असून ती यामध्ये तिचे एब्स दाखवताना दिसते आहे.

या फोटोवर कॅप्शन देत आरती म्हणाली की, 'हॅलो एब्स... आता मी तुम्हाला थोड पाहू शकत आहे. या कोलाज फोटोमधील पहिला फोटो मी एक महिन्यापूर्वी काढला होता आणि दुसरा फोटो आताचा आहे म्हणजेच एक महिन्यानंतरचा आहे. मला माहिती आहे हे अगदीच परफेक्ट नाही आहे. पण लवकरच मी माझ्या टार्गेटपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एका महिन्यात 5 किलो वजन कमी केलं आहे.' 

यापुढे ती म्हणाली की रोज ती 50 मिनिट योगा करते आणि एक दिवस सोडून 40 मिनिट ब्रिक्स वॉकिंग करते. याशिवाय ती चीट डे सुद्धा पाळते. बिग बॉसच्या घरात असताना आरतीचं 8 किलो वजन वाढलं होतं. आणि ते कमी करण्यासाठी आता ती खूप मेहनत करत आहे. आरतीने आता सर्वच चाहत्यांना फिट राहण्याची प्रेरणा दिली आहे. 

arti singh loses 5 kg in self quarantine flaunts her abs in latest pic  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com