Article 370 Trailer: 'द कश्मीर फाईल्स'नंतर आता 'आर्टिकल 370' मांडणार काश्मिरची कहाणी! अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Article 370 Trailer Out: यामीच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Article 370
Article 370

Article 370 Trailer Out: अभिनेत्री यामी गौतमनं (Yami Gautam) बॉलिवूडमध्ये तिची विशेष ओळख निर्माण केली आहे. यामीच्या उरी (Uri), द थर्सडे (A Thursday) यांसारख्या चित्रपटांमध्ये यामीनं काम केलं. आता यामीचा 'आर्टिकल 370' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधील सीन्सनं आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'आर्टिकल 370' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला काश्मिरचे खोरे दिसते. नंतर "कश्मीर इज के लॉस्ट केस" हा यामी गौतमचा डायलॉग या चित्रपटात ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये काश्मिरमध्ये घडणाऱ्या घटनांची झलक दिसते. तसेच ट्रेलरच्या शेवटी 'पूरा का पूरा कश्मीर भारत का हिस्सा था और रहेगा' हा डायलॉग ऐकू येतो. चित्रपटातील काही सीन्स पाहून अंगावर शहारे येतात.

यामीनं सोशल मीडियावर 'आर्टिकल 370' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं या ट्रेलरला कमेंट केली, पावरफुल ट्रेलर आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सगळ्यांचा माइंड ब्लोइंग अभिनय केला आहे."

कधी रिलीज होणार 'आर्टिकल 370'?

'आर्टिकल 370' या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलं आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

'आर्टिकल 370' ची स्टार कास्ट

यामीसोबतच 'आर्टिकल 370' या चित्रपटात प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अभिनेते अरुण गोविल हे पंतप्रधानांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com