गायन, वाचन आणि मस्त वामकुक्षी 

पंकज विष्णू 
Friday, 18 September 2020

आमच्या क्षेत्रात शनिवार-रविवार हेच सुट्टी मिळण्याचे वार असतात असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल तोच माझा वीकएण्ड आणि मलाही वीकएण्ड हा एन्जॉय करायला आवडतो.

परदेशांत वीकएण्ड साजरा करणं ही एक छान संकल्पना आहे. तिथं अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण शनिवार-रविवार आपल्या पद्धतीनं एन्जॉय करतात. आमच्या क्षेत्रात शनिवार-रविवार हेच सुट्टी मिळण्याचे वार असतात असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल तोच माझा वीकएण्ड आणि मलाही वीकएण्ड हा एन्जॉय करायला आवडतो. अनायसे शनिवार-रविवार अशी सुट्टी मिळाली, तर घरातले बाकी लोकसुद्धा घरी असतात. मग त्या दिवशी थोडं उशिरा उठलं जातं. त्यानंतर मस्तपैकी पेपर वाचत चहा पिणं हा माझा ठरलेला कार्यक्रम असतो. अर्थात तसं जरी असलं तरी मी जिमला जाणं त्या दिवशी टाळत नाही; मी आवर्जून वर्कआऊट करतो.

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दर रविवारच्या नाश्त्याची जबाबदारी माझ्यावर असते, जो बनवायला मला खूप आवडतं. मग तेव्हा ब्रेड ऑम्लेट किंवा एखादा वेगळा पदार्थ करणं यात एक तासभर जातो. मग रोजच्या व्यस्त शेड्युलमध्ये जे कार्यक्रम पाहायचे राहून गेलेत, जे चित्रपट पाहायचे राहिलेत ते बघून त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. या लॉकडाऊनच्या काळात मी स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे, ज्यात मी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवून अपलोड करत असतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी त्याचंही काम सुरू असतं. आता कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ बनवायचा, त्याचा विचार सुरू असतो. त्या दिवशी युट्यूबसाठी एखादा व्हिडिओ मी शूट करतो. मला छान गाता येतं, तसंच मी गिटारही शिकतोय. गाणं गाताना सोबत गिटार वाजवता आलं, की ते ऐकणाऱ्याला छान वाटतंच; पण गाणं गातानाही मज्जा येते. म्हणून सुट्टीच्या दिवशी गिटारची प्रॅक्टिस करणं, गिटारवर नवीन गाणं बसवणं याला मी थोडा वेळ देतो. घरी असल्यावर कुटुंबाप्रमाणंच मी स्वतःलाही थोडासा वेळ देतो. मला वाचन करायला आवडतं, त्यामुळे मी या टाईममध्ये मी पुस्तकं वाचतो. त्यानंतर दुपारी शक्य झालं, तर छोटीशी वामकुक्षी घ्यायलाही मला आवडतं. रविवार दुपारची वामकुक्षी ही एक छान गोष्ट असते; थोडा आराम करता येतो. तसंच आमच्या घराजवळच समुद्र आहे. तिथं गेल्यावर छान निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे एखाद्या संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यालगतच्या त्या रस्त्यावर लॉंग ड्राईव्हला जाणं, सूर्यास्ताच्या वेळी थोडा वेळ समुद्रकिनारी घालवणं मला अतिशय आवडतं. असा सगळा छान दिवस घालवून रिफ्रेश झाल्यानंतर पुन्हा पुढच्या आठवड्यात जोमाने काम करायला मी तयार असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(शब्दंकन : राजसी वैद्य) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Weekend celebrity pankaj vishnu

Tags
टॉपिकस
Topic Tags: