जिमला तर जात नाही, मग दीपिका एवढी फीट कशी?

दीपिका पदुकोण
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

काय आहे दीपिकाचं फिटनेस रहस्य? जाणून घ्या!
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फीट : दीपिका पदुकोण

मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे डाएट मी घेते. मी दक्षिण भारतीय असल्यामुळे मला भात खायला खूप आवडतो. असे असले तरी मी रात्रीच्या जेवणात भात व मांसाहार कधीच घेत नाही. दर दोन तासांनी मी काहीतरी खात असते, ज्याने शरीरातील चयापचयाची क्रिया चांगली राहतो. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातही मी घरचे जेवण घेते. यामध्ये चपाती, भाजी, डाळ, सलाड आणि रायता याचा समावेश असतो.

सकाळच्या नाश्‍त्यामध्ये लो फॅट असलेले दूध, दोन अंडी, इडली किंवा उत्तप्पा घेते. दुपारच्या जेवणामध्ये दोन चपात्यांसोबत भाजी अथवा भाजलेले मासे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये फिल्टर कॉफीसोबत दोन बदाम व रात्रीच्या जेवणात भाजी-चपाती किंवा सलाड खाणे पसंत करते. रात्री मी कधीकधी डार्क चॉकलेट घेते. यामुळे चयापचय सुधारते.

मला जीमला जाणे आवडत नाही. परंतु, मनाला वाटेल किंवा गरज असल्यास मी जिमला जात असते. शूटिंगच्या दरम्यानही मी जिमला जाते. योगा करणे मला खूप आवडते. मी न चुकता रोज योगा करत असते. मला धावायला आवडत नसल्यामुळे मी योगा झाल्यावर अर्धा तास चालायला जाते. फार काही काम नसताना मी व्यायाम म्हणून नृत्यही करत असते. कामामुळे खूप ताण येत असतो, अशा वेळी मी मेडिटेशनचा आधार घेते. मला वर्कआऊट करायला जमत नाही अशा ठिकाणी मी स्वीमिंग व योगा करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Deepika Padukone on health tips in Maitrin of Sakal Pune Today