सेलिब्रिटी वीकएण्ड : वीकएंडची व्याख्या बदलत गेली!

Mangesh-Borgavkar
Mangesh-Borgavkar

आमचे संपूर्ण घराणे संगीत क्षेत्रात आहे. त्यामुळे वीकएंडला आमचे विविध ठिकाणी कार्यक्रम असायचे. मी वयाच्या सोळा-सतराव्या वर्षापासून गायनाचे कार्यक्रम करीत आहे. त्याचबरोबर प्रत्येक वीकएंडला माझा संगीताचा क्लास असायचा. मी जवळजवळ बारा ते चौदा तास संगीतामध्ये न्हाऊन गेलेलो असायचो. माझ्या एकूणच सांगितिक प्रवासामध्ये तो काळ खूप महत्त्वाचा होता. कारण वीकएंडला कार्यक्रम आणि संगीत शिकणे सुरू होते. त्याचा फायदा आता दिसत आहे. मग ‘सारेगमप’मध्ये मी सहभागी झालो आणि माझे व्यक्तिगत आयुष्य संपूर्ण बदलत गेले, त्याचबरोबरीने वीकएंडची व्याख्याही बदलत गेली. मी २००७ मध्ये मुंबईत आलो आणि येथील लोकांचा वीकएंडला पाहून भारावून गेलो. शनिवारी आणि रविवारी लोक हॉटेलमध्ये जात आहेत...सिनेमाला जात आहेत...पार्टी करीत आहेत...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हे सगळं माझ्यासाठी नवीन होते. कारण मी एका छोट्या गावातून आलो होतो. माझा शनिवार आणि रविवार भरपूर प्रवास आणि कार्यक्रम यामध्ये जाऊ लागला, अनेकांच्या भेटीगाठी त्याच दिवशी होऊ लागल्या. माझे कार्यक्रम मोठमोठ्या नाट्यगृहांमध्ये किंवा मैदानावर होऊ लागले आणि त्याचा मला साहजिकच आनंद झाला. मोठे समाधान मिळाले. रसिकांसाठी शनिवार-रविवारी कार्यक्रम करायचो आणि रसिकही त्यासाठी उपस्थित राहायचे व कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद द्यायचे. कार्यक्रम नसल्यावर मित्रांबरोबर फिरायला जाणे आणि एखाद्या आवडीच्या हॉटेलात खाणे, हे ओघाने आलेच. विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलात जायचो, सायनला गुरुकृपा हॉटेलात जायचो. मी मित्रांबरोबर शनिवारी किंवा रविवारी वेळ मिळाल्यावर रात्रीच्या वेळी मरिन ड्राईव्हला चक्कर ठरलेली असायची. 

माझे लग्न झाले आणि पुन्हा वीकएंडची व्याख्या बदलली. माझी पत्नी अपूर्वा डॉक्टर आहे. तिचा नेहमीचा वेळ कामात जायचा आणि ती वीकेएंड कधी येतो, याची वाट पाहायची. मग आम्ही एखाद्या रिसॉर्टला जायचो, हॉटेलात जायचो. माझे सहकलाकार खूप आहेत. ते घरी आल्यास आमच्या गप्पा रंगायच्या. आम्ही सगळे चहाचे भलतेच शौकीन. मग चहा, गाणी आणि गप्पांचा फड रंगायचा. मला दोन वर्षांपूर्वी मुलगी झाली. मीरा तिचे नाव. पुन्हा माझा वीकएंड बदलला. मग लहान मुलांचे गार्डन, त्यांची खेळण्याची दुकाने यांचा शोध घेणे आणि तेथे जाणे सुरू झाले! आपण आठवडाभर काम करतो. त्यामुळे वीकएंडला कुटुंबीयांबरोबर फिरायला किंवा हॉटेलिंगला गेल्यास मनावरील ताण हलका होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com