esakal | प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनीलची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

ram indranil kamath

प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा वयाच्या ४१ व्या वर्षी मृत्यु झाला आहे. मुंबईतील माटुंगा येथे त्याच्या राहत्या घरातील बाथटबमध्ये त्याचा मृतदेह मिळाला आहे. 

प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनीलची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- मनोरंजन विश्वासाठी २०२० हे वर्ष अनलकी असल्याचं दिसतंय. या वर्षात अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. तसंच सुशांत आणि इतर काही प्रसिद्ध कलाकारांच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यातंच आता पुन्हा एकदा एका कलाकाराने आत्महत्या केल्याचं समोर येतंय. प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा वयाच्या ४१ व्या वर्षी मृत्यु झाला आहे. मुंबईतील माटुंगा येथे त्याच्या राहत्या घरातील बाथटबमध्ये त्याचा मृतदेह मिळाला आहे. 

हे ही वाचा: अदनान सामीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, शेअर केला पहिला फोटो    

पोलिसांनी सध्या त्याच्या मृत्युची अनैसर्गिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे. मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की राम इंद्रनील कामतने आत्महत्या केली आहे. राम त्याच्या आईसोबत माटुंगा येथे राहत होता. त्यांच्या या घरातील बाथटबमध्ये मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने त्याच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं आहे.

पोलिस आता या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, राम इंद्रनील कामत यांचा मृतदेह बुधवारी दुपारी तीन वाजता बाथटबमध्ये आढळून आला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. असं असलं तरी रामचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजुन आलेला नाही. हा रिपोर्ट आल्यानंतरच अन्य गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. 

राम एक प्रसिद्ध चित्रकार होता. त्याचबरोबर फोटोग्राफीची देखील त्याला आवड होती. काम एक मायथॉलिजिस्त देखील होता. तो स्वतःला देवी महालक्ष्मीचा सर्वात आवडता मुलगा म्हणवून घ्यायचा. त्याची ग्लासवर्क पेंटिंग मुंबईतील आर्ट सक्रिटमध्ये विशेष प्रसिद्ध होती.   

artist ram indranil kamath was found dead in his mumbai home in bathtub  

loading image
go to top