esakal | अभिनेत्याने समजावल्यानंतर अरविंद त्रिवेदींनी स्वीकारली रावणाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

arvind trivedi

अभिनेत्याने समजावल्यानंतर अरविंद त्रिवेदींनी स्वीकारली रावणाची भूमिका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका रामायणमध्ये Ramayan रावणाची Raavan भूमिका साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी Arvind Trivedi यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. अरविंद यांना खरंतर रामायणात रावणाची भूमिका साकारण्याची इच्छा नव्हती. पण एका नामवंत अभिनेत्याने समजावल्यानंतर त्यांना भूमिकेस होकार दिला होता. त्यांची नात डॉ. अनेरी यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं.

'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "नाना (अरविंद त्रिवेदी) त्यावेळी परेश रावल यांच्यासोबत एका नाटकात काम करत होते. रामानंद सागर यांच्या मालिकेत रावणाच्या भूमिकेची ऑफर मिळाली तेव्हा त्यांनी नकार दिला होता. कारण त्यांना त्यावेळी नाटकात काम करायचं होतं. पण परेश रावल यांनी त्यांना समजावलं. अशी भूमिका आयुष्यात एकदाच मिळते. ही संधी तू गमावू नकोस, असं ते नानांना म्हणाले होते. त्यांच्यामुळेच नानांनी रावणाची भूमिका स्वीकारली होती."

हेही वाचा: 'मन्नत'वर येऊ नका; शाहरुखच्या टीमकडून सेलिब्रिटींना विनंती

अरविंद त्रिवेदी यांनी रामायण मालिकेत रावणाची अविस्मरणीय अशी भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या रावणाला पाहून त्याकाळी लोक अक्षरश: घाबरायचे. त्यांची नजर भेदक होती, तसेच रावणाच्या प्रतिमेला आवश्यक गुण त्यांच्या भूमिकेतून हुबेहुब उतरायचे. आजही अनेक लोकांच्या मनात रावणाची हीच प्रतिमा डोळ्यांसमोर असणं, हे त्यांनी यशस्वीरित्या भूमिका पार पाडल्याचं द्योतक आहे. या मालिकेशिवाय त्यांनी जवळपास 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

loading image
go to top