क्लीनचिट दिल्यानंतर पुन्हा आर्यन खानची कोर्टात धाव...

आर्यन खानला एनसीबीनं गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.
Aryan Khan asks court to return his passport
Aryan Khan asks court to return his passport Google

गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणात(Drugs Case) अटक झालेल्या आर्यन खानला (Aryan Khan)एनसीबीकडून(NCB) काही दिवसांपूर्वीच क्लीन चीट मिळाली. या प्रकरणात आर्यनचं नाव समोर आल्यानंतर महिनाभर त्याला जेलमध्येही ठेवण्यात आलं होतं. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. पण क्लीन चीट मिळाल्यानंतरही अद्याप आर्यन खानला त्याचा पासपोर्ट परत देण्यात आला नव्हता. म्हणून त्यानं गुरुवारी ३० जून रोजी एनडीपीएस विशेष कोर्टात पासपोर्ट परत करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.(Aryan Khan asks court to return his passport)

Aryan Khan asks court to return his passport
एकनाथ शिंदेंवर कंगना झाली भलतीच खुश.. म्हणाली, रिक्षावाला ते..

कोर्टानं यासंदर्भात एनसीबीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत आणि या प्रकरणाची सुनावणी १३ जुलैला होणार आहे. आर्यन खानला एनसीबीनं गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु,चौकशीनंतर तयार करण्यात आलेल्या आरोपींच्या यादीत आर्यनच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

Aryan Khan asks court to return his passport
घरच्या कुकची माही विजला धमकी; म्हणाला,'200 बिहारी आणून उभे करीन आणि...'

एनसीबीने आर्यन विरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्या कारणानं आर्यन खान आणि या प्रकरणात अन्य पाच जणांना क्लीन चीट दिली होती. आर्यन खाननं जामिन देताना लागू केलेल्या अटींचे पालन करत आपला पासपोर्ट कोर्टात जमा केला होता. गुरुवारी ३० जूनला त्यानं आपल्या वकीलांच्या माध्यमातून विशेष कोर्टात एक याचिका आरोपपत्राचा संदर्भ देत दाखल केली ,ज्यात त्याचं नाव सामिल नाही आणि त्याच आधारावर पासपोर्ट परत करण्याची मागणी केली.

Aryan Khan asks court to return his passport
तारक मेहता का उल्टा चष्मा: निर्मात्यांनी आणले नवीन नट्टू काका पण...

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा २४ वर्षीय मुलगा आर्यन खानला ३ ऑक्टोबर,२०२१ रोजी मुंबई किनारपट्टीवर गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापा टाकल्यानंतर अटक केली गेली होती. ड्रग्ज प्रकरणात ही अटक झाली होती. मुंबई हाय कोर्टाकडून जामिन मिळण्याआधी आर्यनला या प्रकरणात २० दिवस जेलमध्ये काढावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com