esakal | गुन्हा सिद्ध झाल्यास आर्यनला होईल 'इतक्या' वर्षांची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

गुन्हा सिद्ध झाल्यास आर्यनला होईल 'इतक्या' वर्षांची शिक्षा

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोर्डेलिया या अलिशान क्रुझवर शनिवारची रात्र पार्टीने रंगली होती. या पार्टीदरम्यान, एनसीबीने छापा टाकला आणि पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं. याच पार्टीत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा सुद्धा सहभागी होता. एनसीबी अधिकाऱ्यांना आर्यन खानकडे ड्रग्ज आढळले असल्याचे समजते आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात असून आरोपींना तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्यन खान या प्रकरणात दोषी आढळणार की नाही हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे. मात्र जर आर्यन खान या प्रकणात दोषी आढळला तर त्याला काय शिक्षा भोगावी लागेल हे जाणून घेऊ.

मुंबईतील क्रुजवर पार्टी करणाऱ्या आर्यन खान आणि इतर लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जर आर्यन खान दोषी आढळला तर त्याला या कलमातील २० बी नुसार १० वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

काय सांगतो कायदा ?

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस कायदा) कलम 20 बी, 8 (सी) 27 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा कलम 20 (बी) अंतर्गत दिलेल्या नियम किंवा अटींचे पालन करत नाही. म्हणजेच, औषधांच्या आयात आणि निर्यातीसाठी त्याला 10 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा: ड्रग्जविषयी आर्यन कोडवर्डमधून बोलायचा, काय होता कोर्टातील युक्तिवाद

भारतीय राज्यघटनेतील कलम 47 राज्यांना औषधांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देते. सध्या असलेल्या कायद्यामध्ये 3 श्रेणींमध्ये ड्रग्ज किंवा अमली पदार्थांची व्याख्या केली आहे.

1- मॅथ, एलएसडी सारखे सायकोट्रॉपिक पदार्थ.

2- मादक पदार्थ उदा. भांग, गांजा, अफू.

3- केमिकल मिश्रीत मादक पदार्थ, ज्यांना कंट्रोल सब्सटेंट असेही म्हणतात.

आर्यन खानला या प्रकरणात दोषी आढळल्यास 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूदही आहे.

loading image
go to top