
Aryan Khan: शाहरुखचा मुलगा आर्यन खान सुपर हॉट नोरा फतेहीला करतोय डेट?
Aryan Khan is dating Nora Fatehi: मनोरंजनाच्या जगात सेलिब्रिटी कोण कधी कोणाला डेट करेल सांगता येत नाही. ताजं उदाहरण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रसिद्ध मॉडेल -डान्सर नोरा फतेहीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: Urfi Javed: आता मी भाजपमध्ये प्रवेश करते.. उर्फी काही थांबायचं नाव घेईना..
स्टार्समधील लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा या नेहमीच होत असतात. सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते या चर्चेने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान डान्सिंग दिवा नोरा फतेहीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
झालं अस की, सोशल मीडियावर दोन्ही स्टार्सचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अलिकडे आर्यनच नाव अन्यना पांडे बरोबर जोडलं गेलं होतं पण एका पार्टीमध्ये आर्यनने अन्यनाला चक्क इग्नोर केले होते. झालं असं की दुबईमध्ये आर्यन खानने न्यू इयरची पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये हार्दिक सिंधूशिवाय त्याचे अनेक मित्र दिसले. नोरादेखील पार्टीमध्ये होती. एका फोटोमध्ये आर्यन दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात नोरा फतेही आहे. मात्र, या फोटोंमध्ये आर्यन आणि नोरासोबत एकच फॅन दिसत आहे. मग काय, लोकांची नजर त्यावर पडताच दोघेही एकमेकांना डेट करत असून गुपचूप एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मास्टर माइंड अक्षय केळकरला पाहून बिग बॉस म्हणाले.. तू या खेळाचे..
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेही शेवटची 'अॅन अॅक्शन हिरो' या चित्रपटात दिसली होती. यानंतर लवकरच ती '100 टक्के' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दुसरीकडे, आर्यन खानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि सांगितले आहे की त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे आणि तो शूटिंगसाठी उत्सुक आहे.