
Aryan Khan: अंबानींचा सोहळा म्हणजे बॉलीवूड लोटून हजर असतं. नुकताच याचा दाखला पहायला मिळाला तो NMACC या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्या निमित्तानं. या सोहळ्यात चमचमते सितारे एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र नजरेस पडले. प्रत्येकाचा ग्लॅमरस आणि सिंझलिंग अवतार थक्क करणारा आणि नजरेचं पारणं फेडणारा होता.
म्हणे अनेक वर्षांनी सलमान-ऐश्वर्या एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले ते याच सोहळ्यात. आता याच सोहळ्यात शाहरुखची संपूर्ण फॅमिली देखील झाडून हजर होती. या सोहळ्यातील शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि सुहाना खानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहिल्यावर अनेकांनी किंग खानच्या लेकाला ट्रोल केलं आहे.
चला जाणून घेऊया नेमकं झालंय काय?(Aryan Khan with suhana khan Troll NMAACC Video Viral)
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यातील अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव त्यावर झालेला दिसून आला. यातील काही फोटो आणि व्हिडीओ ट्रोल देखील झाले. त्यातलाच एक ट्रोल झालेला व्हिडीओ आहे आर्यन खान आणि सुहाना खानचा.
ज्यात आर्यन खान आणि सुहाना खान पापाराझीला पोझ देण्यासाठी कॅमेऱ्यासमोर उभे राहिलेले दिसत आहेत. पण यामध्ये एक गोष्ट पटकन लक्ष वेधून घेताना दिसते ती म्हणजे सुहाना खान ही आर्यन खानची बहिण असली तरी तिच्यासोबत पोझ देताना आर्यन खान थोडा गोंधळल्यासारखा वाटतोय. त्यानं तिच्या कमरेवर हात तर ठेवला पण कमरेला हाताचा स्पर्श न करता. अन् हेच नेटकऱ्यांनी हेरलं अन् आर्यनला ट्रोल करु लागले.
हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
आर्यनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी कमेंट करत लिहिलं आहे की,'सुहाना बहिणच आहे ना मग तिला हात टच झाला तर काय एवढं...',अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स आहेत तर एकजण चक्क मुसलमान धर्मात बहिणीला स्पर्श करत नाही असं म्हणत बरंच काही लिहून गेला आहे. कुणीतरी त्याला नाव ठेवत लिहिलं आहे,'उगाचच जंटलमन व्हायचा प्रयत्न करतोय..'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.