अरबाजला येतेय आर्यनची आठवण; मित्राला भेटण्यासाठी कोर्टात घेणार धाव | Aryan Khan and Arbaaz Merchant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan, Arbaaz Merchant

अरबाजला येतेय आर्यनची आठवण; मित्राला भेटण्यासाठी कोर्टात घेणार धाव

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा (Aryan Khan) मित्र आणि सहआरोपी अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) याला आर्यनला भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. जामीन मंजूर करताना या दोघांनी एकमेकांना भेटू नये, अशी अट त्यात घालण्यात आली होती. आता ही अट मागे घेण्यासाठी अरबाज कोर्टात अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींना एकमेकांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यासाठी जामीन अर्जामध्ये ही अट समाविष्ट करण्यात आली होती.

अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'माझ्या मुलाला त्याच्या जिवलग मित्राची खूप आठवण येत आहे. त्यामुळे आर्यन खानला न भेटण्याची अट माफ करण्याची विनंती करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्याचा मसुदा तयार केला जात आहे. माझ्या मुलाला दर आठवड्याला एनसीबी अधिकाऱ्यांना भेटायला काहीच त्रास नाही. पण त्याला त्याचा मित्र आर्यनला पण भेटू द्यावं ही विनंती आहे.'

आर्यन खानसह अरबाज मर्चंटला एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली होती. अरबाजजवळ ड्रग्ज आढळल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन आणि अरबाज या दोघांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. अरबाज आणि आर्यन हे जिवलग मित्र आहेत आणि सोशल मीडियावर अनेकदा फोटो, व्हिडीओमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीसाठी हे दोघं एकत्र जात होते, तेव्हाच एनसीबीने या दोघांना अटक केली होती. आरोपींनी एकमेकांशी संपर्क साधू नये म्हणून एनसीबीने या दोघांना न भेटण्याच्या अटीची विनंती कोर्टासमोर केली होती. त्यामुळे आता अरबाजचा अर्ज कोर्ट मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aryan khan
loading image
go to top