आशा भोसले वाढीव वीज बिलाने झाल्या हैराण, हजाराचं बिल थेट लाखांवर..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

वाढीव वीजबिलामुळे सध्या बॉलीवूडपासून ते टीव्ही जगतातील अनेक कलाकार त्रस्त आहेत. आता असाच प्रकार घडलाय पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या बाबतीत.

मुंबई- वाढीव वीजबिलामुळे सध्या बॉलीवूडपासून ते टीव्ही जगतातील अनेक कलाकार त्रस्त आहेत. मुंबईमध्ये लॉकडाऊन दरम्यान अनेक सेलिब्रिटींचं वीजबिल प्रमाणापेक्षा जास्त आलं होतं.ज्यामुळे सोशल मिडियावर अनेकजणांनी त्यांच्या वीजबिल कंपनीला टॅग करत याविषयीची तक्रार केली होती. आता असाच प्रकार घडलाय पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या बाबतीत.

हे ही वाचा: साऊथ सुपरस्टार थालापति विजयवर 'या' अभिनेत्रीने लावला छळ केल्याचा आरोप

गायिका आशा भोसले त्यांच्या लोखंडवाला येथील बंगल्याचं जून महिन्याचं बिल दोन लाख रुपये आलं आहे. बिल आल्यानंतर आशा भोसले यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी महाडिस्कॉममध्ये त्यांची तक्रार दाखल केली आहे. यावर महाडिस्कॉमचं म्हणणं आहे की मीटरच्या सद्यस्थितीतील रिडिंगच्या आधारारावरंच बिल पाठवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आशा भोसले यांना याबाबतीच आधीच सूचना देण्यात आली होती. 

आशा भोसले याचं जून महिन्यातील बिल २ लाख ८ हजार ८७० रुपये एवढं आलं आहे. याऊलट त्याचं मे आणि एप्रिल महिन्याचं बिल हजारांमध्ये होतं. मे महिन्याच बिल ८८५५ रुपये तर एप्रिल महिन्याचं बिल ८९९६ रुपये आलं होतं. हजारांमध्ये येणारं बिल थेट लाखांमध्ये आल्याने आशा भोसलेंना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अचानक बिलामध्ये एवढा मोठा फरक आल्याने आशा भोसले हैराण झाल्या आहेत. ज्यानंतर त्यांनी रितसर तक्रार केली आहे.  

asha bhosle complains about two lakh rupees electricity bill in june 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asha bhosle complains about two lakh rupees electricity bill in june