साऊथ स्टार थालापति विजयवर 'या' अभिनेत्रीने लावला छळ केल्याचा आरोप

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 1 August 2020

साऊथ सुपरस्टार थालापति विजयवर छळ केल्याचा आरोप अभिनेत्री लावला आहे. सोशल साईटवर ट्विट करुन तिने याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई- सध्या मनोरंजनविश्वात एक ना अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. २०२० हे वर्ष संपूर्ण मनोरंजनविश्वासाठीच घातक ठरतंय. साऊथ सुपरस्टार थालापति विजयवर छळ केल्याचा आरोप अभिनेत्री लावला आहे. सोशल साईटवर ट्विट करुन तिने याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा: बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीला खाजगी फोटोंवरुन करत होता ब्लॅकमेल, पोलिसांनी केली २५ वर्षीय तरुणाला अटक

बिग बॉस तमिळची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री मीरा मिथुन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातंच आता पुन्हा एकदा मीरा चर्चेत आली आहे आणि यावेळी मीराने साऊथ सुपरस्टार थालापति विजयवर तिचा निशाणा साधला आहे. मीराने सोशल साईट्सवर याविषयी ट्विट करत विजयवर छळ केल्याचा आरोप लावला आहे.

अभिनेत्री मीरा मिथुनने विजयच्या फॅन क्लबचा मुख्य असलेल्या इम्मेनुएलचं नाव घेत म्हटलं आहे की 'अभिनेता थालापति विजय इम्मेनुएलला सोशल मिडियावर माझा छळ करण्याचे पैसे देतो. तिने तिच्या या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणीसोबत थालापति विजयला टॅग करत म्हटलं आहे की, पूर्ण प्लानिंग करुनविजयद्वारे माझ्यावर सोशल मिडियावर हल्ला केला जातो. इतकंच नाही तर मला आत्महत्येसाठी देखील प्रवृत्त केलं जातं.'

मीराविषयी आठवण करुन द्यायची झालीच तर असं पहिल्यांदा घडत नाहीये की तिने कोणा सेलिब्रिटीवर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. विजय थालापतिवर आरोप करण्याआधी मीराने तृषा कृष्णन, सुपरस्टार रजनीकांत, ऐश्वर्या राजेशसोबतंच इतर अनेक कलाकारांवर तिचा निशाणा साधला होता. विजयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरंच लोकेश कनंगराज दिग्दर्शित 'मास्टर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

meera mitun has targetted thalapathy vijay for abusing on social media


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meera mitun has targetted thalapathy vijay for abusing on social media