वयाच्या ८६ व्या वर्षी आशा भोसले यांनी 'या' गाण्याने केलं स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च..

aasha bhosale
aasha bhosale

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यातंच अनेक सेलिब्रिटी सोशल मिडियावर ऍक्टीव्ह होताना दिसतायेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने स्वतःचं युट्युब चॅलेंज लॉन्च केलं होतं. आता सलमाननंतर बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च केलंय. याआधी आशा भोसले यांची नात जनाई भोसलेने देखील स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च केलं होतं. तेव्हा आशाताईंनी म्हटलं होतं की मी देखील युट्युब चॅनेल काढावं यासाठी मुलं हट्ट करत आहेत.आशा भोसले यांची नात जनाई भोसलेने देखील स्वतःचं युट्युब चॅनल लॉन्च केलं होतं. तेव्हा आशाताईंनी म्हटलं होतं की मी देखील युट्युब चॅनेल काढावं यासाठी मुलं हट्ट करत आहेत.

गायिका आशा भोसले यांनी 'मै हुं' या गाण्याने त्यांच्या युट्युब चॅनलची सुरुवात केली आहे. पद्म विभुषण पुरस्काराने सन्मानित दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या युट्युब चॅनलचं बुधवारी रात्री ९ वाजता मै हुं गाण्यासोबत प्रिमियर पार पडला. या गाण्याला रोहित श्रीधर यांनी संगीत दिलं आहे तर गाण्याचे बोल रजिता कुलकर्णी यांचे आहेत. 

आशा भोसले यांनी ट्वीटरवर ट्विट करत लिहिलंय, 'मी लवकरंच माझ्या वैयक्तिक कथा, रेकॉर्डिंग दरम्यानचे अनुभव आणि बरंच काही माझ्या या अधिकृत युट्युब चॅनलवर शेअर करणार आहे. आजच्या घडीला 'मै हुं' या गाण्याची आवश्यकता आहे. यामुळे आशा, प्रेम आणि सकारात्मकता पसरेल. आपला देश आणि संपूर्ण जग सध्या एका संकटातून जात आहेत. मला आशा आहे की हे गाणं त्या सगळ्या लोकांच्या मनात शांती निर्माण करेल जे मनापासून हे गाणं ऐकतील.' गेली ६ दशकं आशा भोसले इंडस्ट्रीमध्ये आहेत.

आशाताईंनी सांगितलं की हे चॅनल बनवण्यासाठी जनाईने माझी मदत केली. ती माझी केवळ नातंच नाहीये तर मला तिच्यात माझीच सावली दिसते. आशा भोसले यांनी अनेक सुपरहिट गाणी सिनेइंडस्ट्रीला दिली आहेत. 'जरा सा झुम लू मैं', 'दिल ले गई', 'दम मारो दम', 'राधा कैसे ना जले', 'चेहरा क्या देखते हो', 'आज जाने की जीद ना करो' यासारख्या अगणित गाण्यांचा यात समावेश आहे.   

asha bhosle launch her youtube channel at the age of 86 debuted with this song  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com