फोटोमधील 'या' क्युट मुलीला ओळखलंत का? आज आहे बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 14 May 2020

तुमच्या आवडत्या अभिनेत्रीने तिच्या सोशल अकाऊंटवरुन तिचे लहानपणीचे फोटो शेअर केलेत. हे क्युट आणि गोड फोटो पाहून तुमचा क्षीण असांच निघून जाईल.

मुंबई- लॉकडाऊनमध्ये घरात बसून तुम्ही नक्कीच बोअर झाला असाल. त्यातंच शूटींग बंद असल्याने मनोरंजनासाठी देखील तुमचे आवडते कार्यक्रम तुम्हाला पाहता येत नाहीयेत. मात्र असं असलं तरी तुमचे आवडते सेलिब्रिटी तुमच्या मनोरंजनाची खास काळजी घेताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या वेळेत अनेक सेलिब्रिटी घरात बसून तुमचं मनोरंजन कसं करु शकतील आणि तुमचं प्रेम कसं मिळवू शकतील याचे एक ना अनेक प्रयत्न करताना दिसून येत आहे. सोशल मिडियावर चाहत्यांसाठी ते त्यांचे सध्याचे अपडेट्स शेअर करत आहेत देणेकरुन ते त्यांच्यासोबत जोडले जातील. अशातच आता तुमच्या आवडत्या अभिनेत्रीने तिच्या सोशल अकाऊंटवरुन तिचे लहानपणीचे फोटो शेअर केलेत. हे क्युट आणि गोड फोटो पाहून तुमचा क्षीण असांच निघून जाईल.

हे ही वाचा: श्रीदेवीला या कारणामुळे शाहरुखच्या बाजीगरमधून केलं होतं रिप्लेस

लहानपणी गोलुमोलु दिसणारी ही क्युट मुलगी आहे आत्ताची बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री सारा अली खान. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सारा अली खानच्या लहानपणींच्या फोटोंचा हा खजाना.

This Video Of Baby Sara Ali Khan On Sets With Her Dad Saif Ali ...

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सारा अली खानने आत्तपर्यंत केवळ ३ ते ४ सिनेमे करुन प्रेक्षकांमध्ये तिच्याविषयी क्रेझ निर्माण केली आहे. इतकंच नाही बॉलीवूडमध्ये येण्याआधी सारा अली खानचं वजन ९० किलो पेक्षाही जास्त होतं मात्र तिने स्वतः ज्या मेहनीतने बदललं त्यासाठी ती आज अनेकांची प्रेरणास्त्रोत बनलीये. 

Throwback! Sara Ali Khan's Childhood Pictures With Her Friend Are ...

सारा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच तिचे फोटो वर्कआट व्हिडिओ शेअर करत असते मात्र यावेळी तिने तिच्या लहानपणीचे काही फोटो शेअर करत तिच्या खास मैत्रीणींची आठवण काढली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Through thick and thin

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या या फोटोमध्ये ती खूप मस्तीखोर असल्याचं दिसून येतंय. तिच्या या मस्तीमुळे तिला नेहमी ओरडा पडायचा. 

NBT

तर हा दुसरा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा साराचे वडिल अभिनेता सैफ अली खान करिना कपूरसोबत दुसरं लग्न करत होता. यामध्ये ती तिच्या खास मैत्रीणींसोबत दिसत आहे.

साराचे वडिल सैफ अली खानसोबत खूपंच गोड फोटो आहेत. सारा सैफसबत त्याच्या शूटींगच्या सेटवर देखील जायची. वडिल आणि मुलीचं हे गोड नातं या फोटोंमधूनंच तुम्हाला दिसून येत असेल. 

Sara Ali Khan feeding Saif Ali Khan in THIS rare childhood photo ...

Sara Ali Khan's childhood video playing with dad Saif Ali Khan is ...

साराला तिच्या आईवडिलांसारखं अभिनय क्षेत्रातंच नाव कमवायचं होतं आणि तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं. 

Saif Ali Khan Says His Daughter Sara Ali Khan Is Way Better Than ...

लहानपणापासुनंच सारा फोटोसाठी अशा एकापेक्षा एक पोझ द्यायची की जसं काही सिनेमासाठी शॉटंच देत आहे. 

बॉलीवूडच्या आजच्या यंगस्टर्स अभिनेत्रींमध्ये सारा एकदम फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.

 Sara Ali Khan's transformation journey will definitely motivate you

मात्र बॉलीवूडमध्ये येण्याआधी तीचं वजन ९६ किलो एवढं होतं. मात्र साराने तिच्या लूकवर अपार मेहनत घेऊन आज ती एक ग्लॅमरस अभिनेत्री बनलीये.   

super cute chubby sara ali khan and her rare childhood pictures


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: super cute chubby sara ali khan and her rare childhood pictures