Asha Bhosle : मंगेशकरांच्या संगीत सेवेपुढे कोणताही पुरस्कार छोटाच! फडणवीसांकडून आशा भोसलेंचे कौतूक

केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाची जादू कायम आहे त्या आशाताई भोसले यांना आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले.
Asha Bhosle
Asha Bhosle

Asha Bhosle Maharashtra Bhushan Award Devendra Fadnavis Reaction: केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाची जादू कायम आहे त्या आशाताई भोसले यांना आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतरत्न सचिन तेंडूलकर, सुधीर मुनगंटीवार, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ, उदित नारायण उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशा ताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण अनेकवेळा व्हर्सेटाईल शब्द वापरतो.त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशा ताई आहेत. त्यांनी गायलेली गाणी खूप अवीट आहे. त्यांनी भक्तीगीत ते पॉप, रॉक पर्यत सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांनी त्यांचे वैशिष्ट्य सातत्यानं जपले आहे.

वीस भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत. हजारो गाणी त्यांनी गायली आहेत. त्या प्रत्येक गाण्यात त्यांनी वेगळेपण जपले आहेत. शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले होत नाही. मंगेशकर कुटूंबियांनी जी संगीताची सेवा केली ती अविस्मरणीय आहे. कुठलाही पुरस्कार त्या सेवेपुढे छोटाच आहे. आपलेपण पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. असेही फडणवीस म्हणाले.

Asha Bhosle
Viral Video : घे डबल! आमदारांची 'तंबाखूची मळामळी'! मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच...

सर्वोत्तम गायिका आशा भोसले आहेत. आताच्या तरुण पिढीच्या आयकॉनिक गायिका म्हणूनही त्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी आवाजातील विविधता जपली आहे. आशा ताईंच्या गाण्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी श्रोत्यांना खूप स्वरानंद दिला. एकाच दिवशी सात गाणी गाण्याचा विक्रम आशा भोसले यांचे नाव घेता येईल. या शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com