आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट.. असा होता भेटीचा सोहळा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

asha bhosle meets raj thackeray at his home shivtirth for ask about health

आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट.. असा होता भेटीचा सोहळा..

asha bhosle meets raj thackeray :ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आशा भोसलेंनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या दादरमधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ठाकरे आणि मंगेशकर घराण्याचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. त्यामुळे राज यांची विचारपूस करण्यासाठी त्या आल्या होत्या. राज यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याचे निमित्त या भेटीमागे होते.

(asha bhosle meets raj thackeray at his home shivtirth for asking about health)

राज यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेले काही दिवस त्यांचे पायाचे दुखणे बाळवले होते. त्याविषयी बरीच चर्चा देखील झाली होती. सध्या अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी राज यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमानंतरी देवेंद्र फडणवीस यांनीही राज यांची भेट घेतली होती. आता राज यांच्या प्रकृतीच्या चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले देखील राज यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. राज आणि आशा भोसले यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीदरम्यानचा एका फोटो समोर आला आहे.

या फोटोमध्ये राज यांच्या एका हातात वॉकिंग स्टीक असून त्यांच्या बाजूला आशा भोसले उभ्या आहेत. राज यांनी आशा भोसलेंच्या खांद्यावर हात ठेवला असून त्यांनीही दोन्ही हातांनी राज यांचा हात पकडल्याचं दिसत आहे. दोघेही कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहेत. शस्त्रक्रीयेनंतर राज यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून राज यांची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले त्यांच्या घरी गेल्या होत्या.

राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर २० जून रोजी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी राज घरी परतले. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली होती. 'आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!' असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

Web Title: Asha Bhosle Meets Raj Thackeray At His Home Shivtirth For Asking About Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top