पंढरपूर: मंदिराच्या गाभाऱ्यातील दैवी अनुभूती, कार्तिकीने सांगितला किस्सा

कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत.
Kartiki Gaikwad
Kartiki GaikwadGoogle

कार्तिकी गायकवाड(Kartiki Gaikwad) हे नाव 'लिटील चॅम्प- सारेगमप' च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. ती त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे गायन क्षेत्रातला तिचा यशस्वी प्रवास सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्म घेण्याचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत. (Ashadhi Ekadashi- Kartiki Gaikwad sakal Podcast Interview)

कार्तिकीनं याच मुलाखतीत पंढरपुरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात रात्री १२ वाजता तिला आलेला एक विलक्षण अनुभव शेअर केला आहे. हा अनुभव तिला देवाच्या अधिक जवळ नेणारा,धन्य करणार होता असं देखील तिनं नमूद केलं आहे. आता नेमकं काय म्हणाली आहे कार्तिकी,कसा होता तो विलक्षण अनुभव,ती दैवी अनुभूती हे जाणून घ्यायचं असेल तर मात्र कार्तिकी गायकवाडची पॉडकास्ट मुलाखत आपल्याला नक्कीच ऐकावी लागेल. या बातमीत त्या पॉडकास्टची लिंक जोडलेली आहे.

Kartiki Gaikwad
उद्धवजींचे आभार मानत दिया मिर्झानं केलं ट्वीट,अग्निहोत्रींनी उडवली थट्टा

कार्तिकीनं याच मुलाखतीत वारीशी असलेलं तिचं खास कनेक्शन देखील शेअर केलं आहे. वारी म्हणजे आपल्यासाठी बोनस सण असं म्हणताना लहानपणापासून ते आतापर्यंतचे कार्तिकीचे वारीमधील थक्क करणारे एकेक अनुभव ऐकण्याजोगे. मुलाखतीतील तिचे ते अनुभव ऐकून आयुष्यात एकदा तरी वारीचा तो आनंद सोहळा आपणही अनुभवा असं जर तुम्हाला वाटलं नाही तर नवलंच. या मुलाखतीत कार्तिकीनं तिच्या मोबाईलमधील विठ्ठलाच्या फोटोशी तिचं असलेलं खास कनेक्शन शेअर केलं आहे. पण त्या अनुभवांचा गोडवा चाखण्यासाठी,विठ्ठलाशी कार्तिकीचं असलेलं ते खास कनेक्शन जाणून घेण्यासाठी बातमीत जोडलेली कार्तिकीची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

Kartiki Gaikwad
जेव्हा महाराष्ट्राच्या CM ना जॅकी म्हणतो,'क्या भिडू...'; वाचा मजेदार किस्सा

कार्तिकी गायकवाडनं नुकतीच 'सारेगमप लिटील चॅम्प'च्या च्या नवीन पर्वाची परिक्षक म्हणूनही भूमिका बजावली आहे. यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगचा आपण कसा सामना केला यावरही या पॉडकास्ट मुलाखतीत कार्तिकीनं आपली भूमिका मांडली आहे. देवाचं नाव अन् त्याचं रुप नुसतं पाहिलं तरी डोळे अलगद पाणावतात याचं कार्तिकीनं केलेलं वर्णन तिच्या तोंडून ऐकण्यातच खरा आनंद आहे. तेव्हा कार्तिकी गायकवाडची आषाढी एकादशी निमित्तानं केलेली एक्सक्लुसिव्ह पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका. या बातमीत पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com